एक्स्प्लोर

Raj Thackeray:तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर, राज ठाकरेंचा मराठीवरुन रोखठोक इशारा

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी भाषेसंदर्भातील विजयी मेळाव्यात बोलताना तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर असा सूचक इशारा दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा राज्य सरकारकडून 29 जून रोजी करण्यात आली होती. त्यानंतर विजयी मेळाव्याचं आयोजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वरळीतील डोममध्ये करण्यात आलं आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. सरकारला फक्त मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली. आजच्या मेळाव्यात किंवा यापुढं देखील मराठीच्या मुद्यावर  कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा असेल, असं राज ठाकरे म्हणाले. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर असा इशारा राज ठाकरेंनी दिला. 

सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या सर्व तमाम मराठी भगिनींनो बांधवांनो मातांनो, खरंतर दोघांची भाषणं संपली की एकत्र आरोळ्या ठोका, खरंतर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूनं एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं, नुसत्या मोर्चाच्या चर्चेनं माघार घ्यावी लागली, असं राज ठाकरे म्हणाले. 

खरंतर आजचाही मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला पाहिजे होता, मैदान ओसंडून वाहिला असता, पाऊस आहे, पावसात फारशा जागा मिळत नाहीत मुंबईत, म्हणून आज तुम्हाला इथं यावं लागलं. बाहेर उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, आता स्क्रीनवर आटपा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.  

मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, बऱ्याच चॅनेलचे कॅमेरे जमले आहेत, संध्याकाळी सगळं सुरु होईल, काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती, कोणी हसलं का, काय बोलतात का?मूळ विषय सोडून इतर गोष्टीत इंटरेस्ट असतो, असं राज ठाकरे म्हणाले.  

तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात

कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा, माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेड्या वाकड्या नजरेनं कुणी पाहायचं नाही, ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी घोषणा द्यायची हा प्रश्न अनाठायी होता, काही गरज नव्हती, कुठून हिंदीचं अचानक आलं कळलं नाही, हिंदी कशासाठी, कोणासाठी हिंदी,लहान लहान मुलांवर जबरदस्ती करताय, कोणाला विचारयचं नाही, शिक्षणतज्ज्ञांना विचारायचं नाही, आमची सत्ता आहे, बहुमत आहे, आम्ही लादणार हे चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले. 

तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्या कडे सत्ता आहे रस्त्यावर,एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिलं, नंतर ते दादा भुसे माझ्याकडे आले, मला म्हणाले आम्ही काय म्हणतोय एवढं समजून घ्या, ऐकून घ्या, दादा तुम्हाला सांगतो तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. कुठून त्रिभाषा सूत्र आणलं, त्रिभाषा सूत्र आलं ते फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील दुव्यासाठी त्रिभाषा सूत्र आणलं गेलं. कोर्टात, हाय कोर्टात, सुप्रीम कोर्टात इंग्रजीचा वापर होतो, कुठं आहे भाषा सूत्र, नव्या शिक्षण धोरणात नाही, इतर कुठल्याही राज्यात नाही, दक्षिणेतील राज्य हिंग लावून विचारत नाहीत, महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल , त्याशिवाय का माघार घेतली, असं राज ठाकरे म्हणाले. 

दादा भुसेंना म्हटलं, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश,  मध्य प्रदेश कुठली तिसरी भाषा आणणार आहात. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी न बोलणारी राज्या आर्थिकदृष्ट्या प्रगत, हिंदी बोलत नसलेल्या राज्यात नोकरीसाठी हिंदी भाषा बोलणारे लोक येत आहेत. भाषा कोणतीही श्रेष्ठ असते, मराठी, गुजराती, बंगाली असेल, हिंदी असेल, एक भाषा उभी करायला खूप ताकद लागते, लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते, भाषा अशाच उभ्या राहत नसतात, हे भाषेचं नवीन कुठून आणलं असा सवाल राज ठाकरेंनी केला.  

अमित शाह म्हणाले, ज्याला इंग्रजी येतेल त्याला लाज वाटेल, अरे तुम्हाला येत नाही. या संपूर्ण हिंद प्रांतावर  १२५ वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. या प्रदेशांवर राज्य केलं, आम्ही मराठी लादली? गुजरात, मध्यप्रदेश,  पंजाबवर, अटकपर्यंत मराठी साम्राज्य पोहोचलेलं आम्ही मराठी लादली? का असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी केला. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
Embed widget