एक्स्प्लोर

Raj Thackeray On New Year: शेतकरी, कष्टकरी सर्वांचं आयुष्य होरपळून निघतंय; मराठीवर हल्ला केल्यास...; नववर्षानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray On New Year: मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray On New Year मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवीन वर्षानिमित्त एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट केली आहे.  25 वर्षात अनेक बदल, तरी काही गोष्टी आहेत तशाच राहिल्या. मराठी माणूस अजूनही महाराष्ट्राच्या राजधानीत असुरक्षितच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच मराठीवर हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावल्यासही अंगावर येईन, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा...कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की 25 वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या 25 वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या 25 वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं, असं राज ठाकरेंनी सांगितलं. 

नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे- राज ठाकरे

२३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत. असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.

अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा- राज ठाकरे

मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा, असं राज ठाकरे म्हणाले. महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा...लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा, असं राज ठाकरेंनी एक्सपोस्टद्वारे म्हटलं आहे.

संबंधित बातमी:

कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
Embed widget