![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात, ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले : राज ठाकरे
Raj Thackeray Full Speech in Thane : राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, यांच्यासह शरद पवार, सुषमा अंधारे यांच्यावर ठाणे येथील सभेतून जोरदार निशाणा साधला आहे.
![पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात, ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले : राज ठाकरे Raj Thackeray Full Speech Critisied Uddhav Thackeray Sharad pawar Chhagan Bhujbal Thane Lok Sabha Election Maharashtra Politics Marathi news पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात, ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले : राज ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/12/4bbd92f0212e48c5b7531f87cbfd4f7c1715532421497322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे : महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली, काँग्रेस फोडली, छगन भुजबळांना पाठवून बाळासाहेबांची शिवसेना फोडली, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले, असा आरोप करत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांवरही परखड टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी खोके देऊन मनसेचे नगरसेवक फोडले
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही आणि कधी होणारही नाही, पण या सगळ्यात जे आज बोलतायत आमचा पक्ष फोडला, आमचा पक्ष फोडला, तुम्ही जे बसलेले आहाता, कुठच्या तरी आघाडी, जरा एकमेकांकडे एकदा बघा, आपण काय उद्योग केलेत ते. याचं उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात पैकी सहा नगरसेवक खोके-खोके देऊन फोडले होतेत ना, तेव्हा काही नाही वाटलं. अहो, मागितले असते, तर दिले असते. पण काय आहे, ते म्हणतात ना, ढेकणासंगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसलेत.
महाराष्ट्रात पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात
शरद पवारांनाही राज ठाकरेंनी या सभेतून हल्लाबोल केला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, फोडाफोडीच्या राजकारणाची महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल, तर ती शरद पवारांनी केली. पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं. 77-78 साली पुलोद स्थापन केलं. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं, ते शरद पवारांनी या गोष्टीची सुरुवात केली.
माझा बाहेरून पाठिंबा आहे, मी काहीही बोलू शकतो
1991 पुन्हा याचं शरद पवांरानी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची शिवसेना फोडायला लावली. त्यावेळी शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम शरद पवारांनी केलं. ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील. मी काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, मी काहीही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेव्हिकॉल अजून लागलाय. त्याच्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत आमदार घेऊन काँग्रेसने पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे.
राज ठाकरेंच्या भाषणाचे मुद्दे
आनंद आश्रमात गेलो तेव्हा जुने दिवस आठवले, आनंद दिघे आणि माझे मैत्रिपूर्ण संबंध होते. रात्री 12-1 पर्यंत भाषणं चालायची, तेव्हा आचारसंहिता नव्हती. मोठे स्टेज नव्हते. तलावांचं ठाणे टुमदार शहर होतं, आता तलाव बुजवलेत आणि टँकर सुरु झाले आहेत, हे त्याकाळचं नाही, तर अगदी 30-35 वर्षांआधीचं ठाणे असेल, आता काँक्रीट जंगलं उभी राहात आहेत, असं म्हणत त्यांनी ठाणे आणि आनंद दिघे यांच्यासह बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
राज ठाकरेंनी दाखवला सुषमा अंधारेंचा 'तो' व्हिडीओ
सुषमा अंधारेंच्या अनेक क्लिप्स आहेत, मला काही देणं-घेणं नाही. म्हाताऱ्याच्या हातात थरथर करणारा हात, असं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला प्रवक्ता करता आणि आपल्या वडिलांवर प्रेम आहे असं सांगता. छगन भुजबळांबरोबर मांडीला मांडी लावून बसता, तेव्हा वाटलं नाही. कसलं फोडाफोडीचं राजकारण म्हणतायत तुम्ही? मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी त्यांना मिठी मारली आणि म्हंटलो येतो मी. बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे चढउतार आलेत तर, मार्ग काढीन त्यातून, असं राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं आहे.
सुषमा अंधारेंच्या भाषणाचा व्हिडीओ राज ठाकरेंनी दाखवला
राज ठाकरे यांनी लावा रे तो व्हिडीओ म्हणत दाखवलेल्या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा जुना व्हिडीओ दाखवण्यात आला. या भाषणात सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं की, ''वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे, या 80-85 माणसाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे, हात थरथर करायला लागले आहेत, अन् हातात, तलवाल मग तरणीबांड पोरं काय गोट्या खेळायला गेली आहेत का, याच्यावर अग्रलेख कधी लिहिणार.'' असं म्हणत सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती. त्यावरुन राज ठाकरेंनी सभेतून उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला.
अडीच-अडीच वर्षाचं बोलणं बंद खोलीत
सिंपथी मिळाली सुरु होतं मात्र, दोन वर्षांच्या आधीचा काळ काढून बघा. मधातच टुम काढली अडीच-अडीच वर्षाचं बोलणं झालं बंद खोलीत. आमचा मुख्यमंत्री देवेंद्र असणार, असं नरेंद्र मोदी आणि शाह बोलले, तेव्हा नाही बोललात. मला हल्ली कळतंच नाही, कोण कोणासोबत आहेत. सांगण्याचं कारण एवढंच की, 2019 नंतर गोंधळ उडाला, तो तुमच्या महत्त्वकांक्षेपाई, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मला आजही मोदींचे काही मुद्दे पटत नाहीत
हो मी नरेंद्र मोदींना विरोध केला, चांगलं केलं तर बोललो. आज मोदींविरोधात जे बोलतायत, जर समजा 2019 साली मान्य केलं असतं, अडीच वर्ष तुमची, तर केली असती टीका. मला आजही मोदींचे काही मुद्दे पटत नाहीत. देशात चांगल्या मुस्लिमांना दंगे नको असतात. पुण्यात फतवे काढले गेले ना, शिवसेना उबाठा, कांग्रेसला मतदान करावं, का? तर वाहियातपणा करायला मिळाला नाही. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.
मुंब्य्रातील 6 दहशतवाद्यांना अटक
नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे हे तुमच्यासाठी आणलंय, हे फक्त एका मुंब्य्रातलं आहे. मुंब्य्रातील 6 दहशतवाद्यांना अटक झाली. 2002 साली हिजबुलच्या आंतकवाद्याला अटक, इशरत जहां पण मुंब्य्रात अटक, लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्याला अटक, पाॅप्युलर फ्रांटच्या कार्यकर्त्यांना अटक, पॅलेस्टाईनच्या समर्थकांना अटक, मुंब्रा कसं दहशतवाद्यांचे अजेंडा बनत आहे, यावर सामनात अग्रलेख देखील लिहिला होता, आता नाही लिहिणार, असं म्हणत त्यांनी वाढत्या दहशतवादाकडे लक्ष वेधलं आहे.
चांगला मुसलमान यात भरडायला नको
कोण तुमची रिक्षा चालवत आहे, बाजूनं जातंय सुरक्षेचा विषयच नाही. 10 वर्षात डोकं वर काढलं तर, चेचले जाऊ, त्यामुळे हे पाठिंब्याचं सुरुय. चांगला मुसलमान यात भरडला जाणार नाही, याची देखील दक्षता घेतली पाहिजे. विकासाबरोबर सुरक्षा देखील महत्त्वाचा विषय आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ : राज ठाकरेंचं ठाण्याच्या सभेतील अन-कट भाषण
महत्त्वाच्या इतर बातम्या :
राज ठाकरेंचा पुन्हा 'लावा रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; वडील चोरले म्हणता मग...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)