Raj Thackeray : भूमिका बदलणं गरजेचं होतं, मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi : महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहचतील, आम्ही भूमिका बदलतो म्हणता, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे.
![Raj Thackeray : भूमिका बदलणं गरजेचं होतं, मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले... Raj Thackeray clraification for supporting PM Modi Mahuyuti in Lok Sabha Election 2024 Maharshtra Politics Marathi news Raj Thackeray : भूमिका बदलणं गरजेचं होतं, मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/09/6d2355e643202f8f2a1c163edc9578c81712686928066957_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भूमिका बदलणं आवश्यक होतं, असं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे. मोदींना पाठिंबा देण्याबाबतच विश्लेषण सभेतचं केलं. पंतप्रधान मोदींचं (PM Narendra Modi) नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली. राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यावर दिलं आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला.
मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार
राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे की, गुडी पाडवा मेळाव्यात मी सांगितलं मनसेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे. पहिल्या पाच वर्षात आम्हाला त्यांचा भूमिका पटल्या नाहीत, तेव्हा टीका केली होती. टीका केली तेव्हा काय मागितलं नव्हतं, पूर्वीच्या मुद्यांवर टीका होती. महाराष्ट्राबाबतच्या मागण्या मोदींपर्यंत पोहचतील, आम्ही भूमिका बदलतो म्हणतात, पण आमच्या भूमिका या मुद्यांवर आहेत, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं आहे.
भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे
पाच वर्षात काही बदल झाले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं स्वागत ही केलं आहे. राम मंदिर निर्माण, 370 कलम असे अनेक निर्णय चांगले पंतप्रधानांनी घेतले. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना ही भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. राजसाहेबांनी भूमिका बदलल्याचं सांगत मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)