अमित शहांसोबत बैठक झाली आता पुढे काय? राज ठाकरेंना निर्णयासाठी महायुतीकडून अल्टिमेटम, घडामोडींना वेग
Lok Sabha Election 2024 : अमित शाहांसोबत झालेल्या दिल्लीतल्या बैठकीनंतर राज ठाकरे आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray and Amit Shah Meeting : मुंबई : महायुतीच्या (Mahayuti) गाडीला आता मनसेचं (MNS) इंजिनही जोडलं लागण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी (19 मार्च) दुपारी अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. साधारणपणे 40 मिनिटं राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट झाली. राज ठाकरे काल रात्री 8 वाजता प्रायव्हेट जेटनं दिल्लीत (Delhi Visit) दाखल झाले. राज ठाकरेंच्या दिल्लीवारीमुळे ते महायुतीत येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंना महायुतीकडून एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. आता राज ठाकरे यावर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
अमित शाहांसोबत झालेल्या दिल्लीतल्या बैठकीनंतर राज ठाकरे आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच, बाळा नांदगावकर आणि मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे आज चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर राज ठाकरे निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
एका दिवसांत जागावाटप फायनल करायला मनसेला सांगितलं : दीपक केसरकर
मनसे महायुतीत दाखल झाली तर मनसेच्या उमेदवारांना पक्षाच्या इंजिन चिन्हाऐवजी महायुतीतल्या एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असा प्रस्ताव महायुतीनं दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता दीपक केसरकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. एबीपी माझाच्या झीरो अवर शोमध्ये बोलताना केसरकर यांनी ही माहिती दिली. तसंच एका दिवसांत जागावाटपाचा निर्णय घेण्यास महायुतीनं मनसेला सांगितल्याचीही माहिती हाती येत आहे.
अमित शाह-राज ठाकरे भेटीत काय घडलं?
- मनसेकडून मुंबईतल्या 2 जागांचा प्रस्ताव महायुतीला देण्यात आला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्याचा प्रस्ताव दिला गेला.
- मनसेसाठी मुंबईतील एक जागा निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांनी राज ठाकरेंना स्पष्ट सांगितलं.
- लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? राज ठाकरेंनी अमित शहांकडे विचारणा केली.
- विधानसभेत किती जागा? किंवा कसा फॉर्म्युला असेल? यावर आता भाजपकडून कोणतीही कमिटमेंट देणं शक्य नाही, अमित शहांनी स्पष्ट केलं.
- विधानसभेतही सोबत लढू पण जागावाटप त्याच वेळेला ठरवलं जाईल, अमित शहांची स्पष्ट भूमिका
- याआधी उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू विधानसभेचं विधानसभेला ठरवू, अमित शहांचं स्पष्टीकरण
महत्त्वाच्या इतर बातम्या :
EXCLUSIVE: "एकच जागा देणं शक्य"; राज ठाकरेंचा लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव, अमित शाहांनी फेटाळला