एक्स्प्लोर

Raj Thackeray and Amit Shah Meeting : उद्धव ठाकरेंनी जे केलं त्याची पुनरावृत्ती नको, अमित शाहांचा राज ठाकरेंना सावध इशारा

MNS, BJP Seat Sharing: आता मनसे अध्यक्ष अमित शहांसोबतच्या बैठकीवर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट झाली खरी, पण या भेटीत उद्धव ठाकरेंबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Raj Thackeray and Amit Shah Meeting : मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत भाजप (BJP) नेते अमित शहांची (Amit Shah) भेट घेतली आणि मनसेच्या (MNS) महायुतीसोबत जाण्याचं जवळपास निश्चितच झाल्याचं बोललं जात आहे. फक्त घोडं अडलंय ते जागावाटपावरुन. मनसेनं दोन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर ठेवला होता. पण दोन जागा देणं शक्य नाही, केवळ एकच जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी भेटीदरम्यान राज ठाकरेंना स्पष्ट सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आता मनसे अध्यक्ष अमित शहांसोबतच्या बैठकीवर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट झाली खरी, पण या भेटीत उद्धव ठाकरेंबाबतही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

दिल्लीतील बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सुपुत्र अमित ठाकरेही उपस्थित होते. तर अमित शाह यांच्यासह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीत उद्धव ठाकरेंचाही विषय झाला. 

उद्धव ठाकरेंबाबत काय चर्चा झाली? 

राज ठाकरे आणि अमित शाहांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याची EXCLUSIVE माहिती एबीपी माझाकडे आली आहे. राज ठाकरेंनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर एक जागा निश्चित पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असं अमित शाह म्हणाले. विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप, तेव्हाच ठरवू असं शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे,  याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू, अशी स्पष्ट भूमिका अमित शाहांनी मांडली असल्याचं कळत आहे. 

उद्धव ठाकरे हे महायुतीतील भाजपचे जुने साथीदार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सख्ये चुलत बंधू. 2019 च्या निवडणुकांनंतर चित्र पालटलं आणि भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देण्याचं ठरवलं. राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. पण त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच राज्यानं अभूतपूर्व राजकीय भूकंप अनुभवला. आजपर्यंत राज्याच्या सत्तानाट्यात दररोज म्हटलं तरी नवनवे अंक पाहायला मिळतायत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नवा डाव टाकत मनसेला युतीची ऑफर देऊ केली आहे. उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट मोडण्यासाठीच भाजपनं राज ठाकरेंची साथ घेण्याचं ठरवल्याचं बोललं जात आहे. अशातच येत्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अमित शाह-राज ठाकरे भेटीत काय घडलं? 

  • मनसेकडून मुंबईतल्या 2 जागांचा प्रस्ताव महायुतीला देण्यात आला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्याचा प्रस्ताव दिला गेला. 
  • मनसेसाठी मुंबईतील एक जागा निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांनी राज ठाकरेंना स्पष्ट सांगितलं. 
  • लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? राज ठाकरेंनी अमित शहांकडे विचारणा केली.
  • विधानसभेत किती जागा? किंवा कसा फॉर्म्युला असेल? यावर आता भाजपकडून कोणतीही कमिटमेंट देणं शक्य नाही, अमित शहांनी स्पष्ट केलं. 
  • विधानसभेतही सोबत लढू पण जागावाटप त्याच वेळेला ठरवलं जाईल, अमित शहांची स्पष्ट भूमिका 
  • याआधी उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. आता फक्त लोकसभेसंदर्भात बोलू विधानसभेचं विधानसभेला ठरवू, अमित शहांचं स्पष्टीकरण 

पाहा व्हिडीओ : Raj Thackeray meets Amit Shah : दक्षिण मुंबईची जागा भाजपला सोडण्याची भाजपची तयारी : सूत्र

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

EXCLUSIVE: "एकच जागा देणं शक्य"; राज ठाकरेंचा लोकसभेसाठी दोन जागांचा प्रस्ताव, अमित शाहांनी फेटाळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget