Rahul Gandhi vs Narendra Modi : राहुल गांधींनी मोदींसोबत जाहीर चर्चेचं आव्हान स्विकारलं!
Rahul Gandhi vs Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत जाहीर डिबेटचे आव्हान स्वीकारले आहे.
Rahul Gandhi vs Narendra Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत जाहीर डिबेटचे आव्हान स्वीकारले आहे. माजी न्यायमूर्तींच्या पत्राला पोहोच देत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींशी वादविवाद करण्याची जाहीर तयारी दर्शवली आहे. शिवाय पीएम मोदी यासाठी तयार होतात का? केव्हा तयार होतात ते कळवा, असंही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी न्यायमूर्तींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मैं 100% किसी भी मंच पर प्रधानमंत्री से ‘जनता के मुद्दों’ पर डिबेट करने को तैयार हूं,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 10, 2024
पर मैं उन्हें जानता हूं, वो 100% मुझसे डिबेट नहीं करेंगे। pic.twitter.com/lxB8AqlzfN
मोदींनी होकार दिल्यास चर्चेचं स्वरुप ठरवू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर चर्चेस आव्हान स्वीकारल्यास आपण चर्चेचं स्वरुप ठरवूयात. मी किंवा आमचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी कोणीही चर्चेला येऊ, असा निरोप राहुल गांधी यांनी पाठवला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावाला प्रतिसाद मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या धर्तीवर प्रस्ताव
माजी न्यायमूर्ती मदन लोकुर,अजित शाहा व पत्रकार एन राम यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये जाहीर चर्चा केली जाते. त्याच धर्तीवर भारतात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या दोन नेत्यांची जाहीर डिबेट आयोजित करण्याचा माजी न्यायमूर्तींचा मानस आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी आव्हान स्वीकारलं, पण नरेंद्र मोदी या चर्चेसाठी कधी तयार होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Congress leader Rahul Gandhi responds to invitation of former judges Justices Madan Lokur, AP Shah and senior journalist N Ram for a public debate on Lok Sabha Elections. https://t.co/xquIn55fi9 pic.twitter.com/JGuUhuWv9r
— Live Law (@LiveLawIndia) May 11, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
Maval Loksabha : ठाकरेंचा प्रचाराचा धडाका, महायुतीकडे आमदारांची ताकद, नात्यागोत्याचं राजकारण, श्रीरंग बारणेंसमोर तिसऱ्यांदा निवडून येण्याचे आव्हान