देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, माजी खासदाराने गणपती बाप्पासमोर बोलला नवस
Prataprao Chikhalikar : भाजप नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, असा नवस माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी बोलला आहे.
Prataprao Chikhalikar on Devendra Fadnavis, नांदेड : तीन राज्याचे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाळजचा गणपतीला माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नवस बोलला आहे. राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावे, असा नवस गणपतीला केल्याचे प्रतापराव चिखलीकर यांनी सांगितले.
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार यावे, अशी प्रार्थना त्यांनी देवाला केली. चिखलीकर यांनी केलेल्या नवसामुळे पुन्हा एकदा भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी होत असल्याचे पहिला मिळत आहे. नांदेडमध्ये काल देखील भाजप भावी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बॅनर लागले होते. जागावाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील ठरला नाही. मात्र भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांनाच पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.
महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार
राज्यात विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवला जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु
दरम्यान, महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे सातत्याने समोर आले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत. शिवाय महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा, अशी इच्छाही व्यक्त करताना दिसत आहेत.
सिटींग सीट ज्याची त्यालाच जागा सोडली जाणार?
नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेले पाहायला मिळाले होते. नांदेड शहरातील मुख्य चौकांमध्ये हे बॅनर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यात सध्या या बॅनरबाजीची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र, सिटींग सीट ज्याची त्यालाच ती जागा दिली जाईल, असं धोरण जागा वाटपाबाबत असेल, असंही निश्चित मानलं जात आहे. शिवाय महायुतीत उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे अनेक जागांवर वाद होण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात घेऊनच समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता, तर हर्षवर्धन पाटीलही तुतारी हाती घेतील, असं बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत