Praniti Shinde : जुने दिवस परत आणणार, अकलूज-सोलापूर एकत्र आल्यावर काय होतं ते दाखवून देऊ; मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यातून प्रणिती शिंदेंचा एल्गार
Praniti Shinde at Akluj : आता सोलापूर आणि अकलूज एकत्र येतं, तेव्हा काय होतं? दाखवून देऊयात. ते जुने दिवस आज परत आणण्याची गरज आहे.
Praniti Shinde at Akluj : "आता सोलापूर आणि अकलूज एकत्र येतं, तेव्हा काय होतं? दाखवून देऊयात. ते जुने दिवस आज परत आणण्याची गरज आहे. पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण जोरदार कामाला लागूयात. आपण संस्कृती जपून ठेऊयात. आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. वैचारिक लढाई लढायची आहे. विजय आपलाच आहे, हे निश्चित आहे", असा विश्वास काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (दि. 14) शरद पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite–Patil) उपस्थित होते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर चौफेर टीका केली. तर भाजपचे सोलापूर लोकसभेचे आमदार राम सातपुते यांच्यावरही निशाणा साधलाय.
माझं आज मन भरुन आलंय
प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, आज दादांचा आणि काकूंचा आशिर्वाद घेण्यासाठी मी इथे आले आहे. अकलुजकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले आहे. आज दादांनी आशीर्वाद दिला. शिंदे साहेबांनी दादांना आशीर्वाद दिला. याच्यापेक्षा जास्त आम्ही काय मागू शकतो? एवढचं सांगते की माझं आज मन भरुन आलंय. सगळ्या वहिनींना मला आशीर्वाद दिला. माझा सत्कार केला, असंही प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सांगितले.
सोलापूर 3 दिग्गज नेते एकत्र
सोलापुरात आज (दि.14) महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वाचा दिवस ठरलाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील 20 वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आलेले पाहायला मिळाले. 2004 मध्ये हे तिन्ही नेते एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा सोलापूर जिल्ह्यात आत्मविश्वास वाढू लागलाय. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये असले तरी त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने महायुतीला आणि खासकरुन भाजपला मोठा धक्का बसलाय. गेल्या 5 वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त असलेलं मोहिते पाटील घराणे आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलंय.
इतर महत्वाच्या बातम्या