एक्स्प्लोर

नरेंद्र मोदींच्या जागी मी असतो तर 'पुतिन' नीती वापरली असती; प्रकाश आंबेडकरांच्या केंद्र अन् राज्य सरकारला सूचना

रशियाने युक्रेन संदर्भात जी स्ट्रॅटीजी वापरली तीच मी वापरली असती. रशियाने गेल्या 2 वर्षात युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय केलं आहे.

मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या (Terrorist) निषेधार्ह आणि केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध थेट अॅक्शन घेण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हुतात्मा चौकातच येऊन आंदोलन केले. यावेळी, राज्य आणि केंद्र सरकारला उद्देशून त्यांनी काही सूचना केल्या आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या जागी मी असतो तर पुतिन यांची नीती वापरली असती. युक्रेन जर नाटोकडे गेला तर रशियाला धोका असल्याची मानसिकता त्यांची आहे, त्यामुळे त्यांनी युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर उध्वस्त केलं आहे. त्यांचा हेतू हाच आहे की वाढ थांबेल पण युद्ध थांबल्यानंतर युक्रेन पुन्हा नाटोकडे गेला तर धोका कायम आहे. आपल्याला पण अशीच काही नीती वापरली पाहिजे की पाकिस्तान पुढच्या 30 वर्षात मागे जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash ambedkar) रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भत देत काही सूचना केल्या आहेत. 

रशियाने युक्रेन संदर्भात जी स्ट्रॅटीजी वापरली तीच मी वापरली असती. रशियाने गेल्या 2 वर्षात युक्रेनचं इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय केलं आहे. उद्या ज्यावेळी युद्ध थांबेल तेव्हा युक्रेन नाटोकडे गेले तरी त्याचा धोका राहणार नाही. म्हणून रशिया त्यांचे इन्फ्रास्ट्रकचर नष्ट करत आहेत, मी देखील हेच केलं असतं, असे प्रकाश आंबेडकर यांनी युद्धनीतीवर बोलताना म्हटले. 

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, पहलगाम हल्ल्यासंदर्भात आजच सकाळी अधिकृत बातमी आहे की पाकिस्तान आर्मीचा यात सहभाग आहे. आपली मिलिट्री अॅक्शन घ्यायला तयार आहे. पण, सरकारमध्ये असणारी पॉलिटिकल लीडरशिप कुठेतरी कच खात आहे. एकदा युद्ध करायचं ठरवलं की त्याचा परिणाम जनता सहन करायला तयार आहे. जनतेची पण मागणी आहे, प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने आपण माघार घेतो. मात्र, यावेळी अॅक्शन झालीच पाहिजे, सर्वपक्षाचा, जनतेचा पाठिंबा सरकारला आहे. त्यामुळे, रिअॅक्शनची परवा न करता ॲक्शन घ्या अशी लोकांची भावना असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.  

आपले इंटेलिजन्स फेल्युअर, हल्लेखोर कुठं?

आपले इंटेलिजन्स फेल्युअर आहे, याबाबत दुमत नाही. अजून याना हल्लेखोर सापडले नाहीत, ते कुठून आले हे देखील आपल्याला समजलेले नाही. मला असं वाटतं हल्लेखोर लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून गेले आहेत. आता मिलिट्री  आदेश द्यावेत आणि कारवाई करावी. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ठोस कारवाई करतील अशी अपेक्षा करत आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 

मिलिट्रीला डायरेक्ट आदेश द्यावेत

शासनाने कृती आणि व्यवहारात ही गोष्ट आणली पाहिजे,  मी जर माझ्या शब्दात म्हणायचं झालं तर एडवांटेज इंडिया अशी परिस्थिती आहे. राजकीय विल, लढण्यासाठी जी हिम्मत लागते ती देखील सरकारच्या लीडरशिपने आणावी.मिलिट्रीला डायरेक्ट आदेश द्यायला हवे, अशी मागणी आंबेडकर यांनी मोदी सरकारकडे केली आहे. एवढी मोठी आर्मी असूनही आपण अपमानित आहोत, यापेक्षा आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो. शासन कच खात असल्याचे आम्हाला जाणवले म्हणूनच हुतात्मा चौकातच येऊन आम्ही आंदोलनाला बसलो आहेत. वेळ पडली, जर तिजोरी कमी पडणार असेल तर जनता ही स्वतः तिजोरी भरायला देखील तयार आहे, हा संदेश देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

राष्ट्रपती हेच आर्मीचे प्रमुख

पंतप्रधानांनी आदेश देणे आणि कॅबिनेटने आदेश देणे या दोन गोष्टी वेगळे आहेत. राष्ट्रपती हा आर्मीचा प्रमुख अधिकारी आहे. जोपर्यंत राष्ट्रपती आदेश देत नाहीत, तोपर्यंत आर्मी काही करेल असे मला वाटत नाही. अंतर्गत यंत्रणा फेल आहेत याबद्दल दुमत नाही. हल्लेखोर जे कोणी होते ते अजूनही शासनाला सापडले नाही, त्यांची मुव्हमेंट कुठून कुठे गेली याची माहिती देखील शासनाला मिळालेली नाही. लाईन ऑफ कंट्रोल ते क्रॉस करून गेलेत असे मला तरी वाटत नाही. पाकिस्तानचा हेतू हा आहे टू नेशन थेर, त्याचा स्प्रेड आउट करण्यासाठी त्यांनी ही घटना घडवली आहे.  

काश्मीरला टुरिस्ट गेले पाहिजे

काश्मीरमध्ये टुरिस्ट गेले पाहिजे केंद्र शासनाने त्या पद्धतीने पाऊले उचलली पाहिजे. पावसाचा अजून एक महिना शिल्लक आहे, असे मी मानतो. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला निर्देश द्यावे की त्या त्या राज्याने त्यातील पर्यटकांची सोय करावी आणि केंद्र शासनाने त्यांना पूर्ण प्रोटेक्शन द्यावे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातून टुरिझम पाठवण्यासंदर्भात निर्णय घेतला तर माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर ऑफर आहे, त्यांना घेऊन जाण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

हेही वाचा

शिक्षण,पाणी,न्याय अन् हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही; आव्हाडांचा महाजनांवर पलटवार

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget