एक्स्प्लोर

शिक्षण,पाणी,न्याय अन् हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही; आव्हाडांचा महाजनांवर पलटवार

शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे शरद पवारांच्या लक्षात आलं. धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे.

ठाणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुढाकार घेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिर उभारुन त्याचा जीर्णोद्धार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते यावेळी पूजा करण्यात आली. शरद पवारांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्यावरुन मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर खोचक टाकी केली. आता, या टीकेला आमदार आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात, ही हिंदूंची ताकद आहे, असे प्रकाश महाजन यानी म्हटले होते. त्यावर, ह्यात ताकदीचा काय प्रश्न आहे, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी मनसेच्या प्रकाश महाजन यांना प्रत्युत्तर दिलंय. तसेच, 2004 पासून म्हणजेच गेल्या 20 वर्षांपासून या मंदिर उभारणीसाठी मी प्रयत्नशील होतो, असेही आव्हाड यांनी सांगितले.  

शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे शरद पवारांच्या लक्षात आलं. धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले, ही हिंदूंची ताकद आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली होती. त्यावरुन, आव्हाड यांनी पलटवार केला. आपणा सर्वांच्या माहितीकरिता सांगू इच्छितो की, 2004 साली हे मंदिर उभं राहिलं. परंतु, हे रहदारीच्या रस्त्यात असल्याकारणाने तत्कालीन महापालिका आयुक्त व माननीय न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार राहिलं. सदर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस गेली अनेक वर्ष माझ्या मनात होता. कदाचित हे राज्यातील पहिले असे मंदिर असेल ज्यात बांधकामाची तसेच मंदिर वापराची परवानगी घेतली आहे. त्यामागे माझी नितांत श्रद्धा आहे आई तुळजाभवानी मातेवर. समस्त बहुजनांचे, उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे हे प्रतितुळजापूर देऊळ असंख्य भक्तांचे शक्ती स्थान ठरेल. इतिहास साक्षी आहे छत्रपती शिवरायांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

आम्हाला मुंज करण्याची आवश्यकता नाही

आई तुळजाभवानीनेच उभ्या महाराष्ट्राला मोगलाई विरोधात उभे ठाकण्याची ताकद दिली. आमच्यासारख्या बहुजनांना तुमच्यासारख्यांनी पिढ्यानपिढ्या वंचित ठेवलं. शिक्षण,पाणी,न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही, ते तुम्हालाच लखलाभ असू द्या, असा पलटवारही आव्हाडांनी प्रकाश महाजनांवर केलाय. आणि हो आपणही संपूर्ण कुटुंबासहित उभ्या महाराष्ट्राचे कुलदेवी असणाऱ्या तुळजाभवानी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, आपले मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे स्वागतच असेल, असे निमंत्रणही आव्हाड यांनी प्रकाश महाजनांना दिले.

हेही वाचा

ना जात पाहिली, ना धर्म; 25 वर्षात अडीच हजार मुलींचा संसार थाटला;आई-बापाच्या मायेनं केलं कन्यादान

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget