Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prakash Ambedkar Allegation On Shivsena : उद्धव ठाकरे अडचणीत आल्यानंतर त्यांना मदत करेन असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते, त्यामुळे ठाकरे आणि भाजपमध्ये समझोता झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

ठाणे : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समझोता झाला असून त्यामुळेच कल्याण लोकसभा मतदारसंघात नूरा कुस्ती सुरू असल्याचा आरोप वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा एकत्र आल्या तर आश्चर्य मानू नका असंही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे कल्याण लोकसभेचे वंचितचे उमेदवार डॉ. शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचार सभेसाठी उल्हासनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपसह उद्धव ठाकरेंवर देखील घणाघाती टीका केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार कल्याणमध्ये लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्ये समझोता झाला असून निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले. ठाकरेंच्या सेनेने भाजप सोबत समझोता केला आहे, काँग्रेसने देखील त्यांच्या सेनेपासून फारकत घेतली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत नाहीत हे काँग्रेसला लक्षात आलं. ठाकरेंच्या सेनेने काँग्रेसला फसवलं.
प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा:























