एक्स्प्लोर

Police Transfer : निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Police Transfer, Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Police Transfer, Mumbai : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली  झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. 

लोकसभेवेळी राज्य सरकारने सूचना पाळल्या नाहीत, निवडणूक आयोगाचे खडे बोल

लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा ज्सत सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते.

मुंबईतील मतदान केंद्रांवर झालेल्या गैरसोयीबद्दलही आयोगाने व्यक्त केली होती नाराजी 

लोकसभा निवडणुकीवेळी मुंबईतील अनेक मतदारसंघांवर झालेल्या गैरसुविधांबद्दलही निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती.  मुंबईतील मतदान केंद्रांवर बेंच, पंखे , पिण्याचे पाणी सुविधा उपलब्ध असल्याचे खात्री करण्याचे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने आता राज्य सरकारला सूचना दिल्यानंतर आता राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: ठरलं! हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख अन् मुहूर्त झाला निश्चित! जयंत पाटलांनी दिली माहिती, शरद पवारही असणार उपस्थित

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget