नरेंद्र मोदींची NDA संसदीय नेतेपदी निवड; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री अनुमोदन देताना नेमकं काय म्हणाले?
Delhi NDA Meeting: एनडीएमधील सर्व घटकपक्षांनी मोदींची एनडीए संसदीय नेतेपदी निवड करण्यासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
NDA Meeting: नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांचा निकाल (Lok Sabha Election 2024) जाहीर झाला. यंदा भाजपच्या (BJP) जागांमध्ये घट दिसली असली तरीदेखील, एनडीएला (NDA) मात्र बहुमत मिळालं आहे. त्यानंतर मोदींकडून (Narendra Modi) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला. तसेच, नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवडही करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींची एनडीए संसदीय नेतेपदी निवड करण्यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक बोलवण्यात आलेली. त्यावेळी एनडीएमधील सर्व घटकपक्षांनी मोदींची एनडीए संसदीय नेतेपदी निवड करण्यासाठी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आलं. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं.
विरोधकांना जनतेनं नाकारलंय, मोदींना देशातील जनतेनं स्विकारलंय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना अनुमोदन देण्यासाठी मंचावर उभे राहिले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी केली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आजचा दिवस ऐतिहासिक, संस्मरणीय दिवस आहे, आज आपले नेते नरेंद्र मोदी यांना एनडीए संसदीय नेतेपदी निवडण्यासाठी राजनाथ सिंहांनी जो प्रस्ताव ठेवला आहे, त्या प्रस्तावाला मी शिवसेनेकडून अनुमोदन देतो. गेल्या 10 वर्षांत नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून देशाचा विकास केला, देशाला पुढे नेलं, देशाचं नाव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत केलं. आपल्या देशाला एक वेगळी ओळख मिळवून देण्याचं जे आपल्या सर्वांचं स्वप्न होतं, ते पूर्ण केलं. त्यामुळेच विरोधकांनी कितीही खोट्या गोष्टी पसरवून देशाच्या जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाच देशातील जनतेनं नाकारलं आहे आणि नरेंद्र मोदींना स्विकारलं आहे." तसेच, शिवसेना आणि भाजपची युती हा 'फेविकॉल का जोड', तो कधीही तुटणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, "नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मी या प्रस्तावाचं समर्थन करतो."
पाहा व्हिडीओ : CM Eknath Shinde Full Speech : भाजप आणि शिवसेना फॅविकोलचा जोड, कधीच तुटणार नाही : मुख्यमंत्री