एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा...; राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा 'नौटंकी' म्हणत हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येणार आहेत. ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Chandrashekhar Bawankule on Rahul Gandhi : परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार (Parbhani Violence) झाल्याचे दिसून आले. या घटनेत काहींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही (Maharashtra Assembly Winter Session 2024) उमटले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उद्या परभणी दौऱ्यावर येणार आहेत. राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केलाय.

परभणीच्या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे. तरी यांना राजकारण करायचं असल्यामुळे असे होत आहे. त्या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काँग्रेसने राजकारणात पराभव करण्याचं काम केलं. सर्वसामान्यांना अधिकार मिळत असताना बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची तयारी काँग्रेसने केली होती. काँग्रेसचा राहुल गांधी यांचा उद्याचा दौरा हा नौटंकी आहे. महाराष्ट्रातील समाज त्यांना साथ देणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी राहुल गांधींवर केली. 

पवारांच्या परभणी दौऱ्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

शरद पवार शनिवारी परभणी दौऱ्यावर होते. परभणीत शरद पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. याबबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांच्या वयानुसार ते वैद्यकीय परिस्थितीमुळे काल सोफ्यावर बसले असतील. या विषयावर टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. पण त्या कुटुंबाने सुद्धा वर बसायला पाहिजे होतं, त्यावेळी आयोजकांनी काय केलं, त्याची मला माहिती नाही, म्हणून त्यावर बोलणे योग्य होणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

पालकमंत्रीपदावरून वाद होणार नाही

महायुतीत खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत विचारले असता 12 जिल्ह्यात मंत्री नसले तरी, ज्या पद्धतीने खातेवाटप पार पडले आहे, त्याच पद्धतीने पालकमंत्रीपदाचे वाटप होईल, त्यात वाद होणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. 

भुजबळ साहेबांबाबत अजितदादा योग्य निर्णय घेतील 

मंत्रिमंडळातून डावलल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. आज छगन भुजबळ ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार असून ते नेमका काय निर्णय घेणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये भुजबळ साहेबांचं मोठं स्थान आहे. भुजबळ साहेबांच्या राजकीय आयुष्याचा योग्य निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल. अजित दादा, प्रफुल तटकरे योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

महसूल खात्यातील कायद्यात सुधारणा आवश्यक

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर महसूलमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत ते म्हणाले की, मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संपूर्ण महसुली विभागाचा शेतकरी, शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असतो. महसूल खात्यातील कायद्यात सुधारणा आवश्यक आहे. छोट्या छोट्या कारणामुळे विकास प्रकल्प थांबले आहेत. त्यांना पुढे नेण्याचे काम करू. 86 हजार हेक्टर झुडपी जंगलावर कोणतेही झाडे झुडपे नसताना त्याची नोंदी झुडपी जंगल केली आहे. त्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आवश्यक ठिकाणी झुडपी जंगल येथील कायद्याची अडचण दूर होईल, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget