एक्स्प्लोर
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा रोड शो गुजराती समाजासाठी, पण लोकांना तासनतास थांबावं लागतं: शरद पवार
Maharashtra Politics: नाशिक, धुळे, पुणे या भागात कांद्याचा प्रश्न आहे की नाही हे मला सांगा. या भागातील शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे. तरीही पंतप्रधान या मुद्द्याला टच करणार नसतील तर कोणीतरी बोलणार, असे शरद पवार यांनी म्हटले.
![Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा रोड शो गुजराती समाजासाठी, पण लोकांना तासनतास थांबावं लागतं: शरद पवार PM Modi road show in ghatkopar for Gujarati community but it's not wise act says Sharad Pawar Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा रोड शो गुजराती समाजासाठी, पण लोकांना तासनतास थांबावं लागतं: शरद पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/bd327b41d8777f16ed00b94b389bc7ef1715840685525954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PM Modi & Sharad Pawar
Source : PM Modi & Sharad Pawar \ ABP Majha
नाशिक: मुंबईसारख्या शहरात रोड शो करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्यामुळे लोकांना तासनतास थांबावं लागतं, वाहतूक कोंडी होते, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात रोड शो केला होता. या रोड शो साठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. मुंबई पूर्व उपनगर आणि ठाण्याला जोडणारा लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्ग रोड शो साठी बंद ठेवण्यात आला होता. याशिवाय, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो सेवाही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे संध्याकाळी कामावरुन घरी निघालेल्या सामान्य नोकरदारांचे प्रचंड हाल झाले होते. याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना रोड शोच्या मुद्दयावरुन कानपिचक्या दिल्या. मुंबईसारख्या शहरात रोड शो करणं, शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबाव लागते, वाहतूक कोंडी होते. मोदींनी रोड शो घेतला होता, तो भाग प्रामुख्याने गुजराती आहे. मोदींना रोड शो करायचाच होता, तर मुंबईत मोठे रस्ते असलेला भाग होता. पण मोदींचं लक्ष्य विशिष्ट वर्ग होता. मात्र, त्यामुळे लोकांना त्रास झाला, असे शरद पवार यांनी म्हटले.
सत्तास्थापनेच्या वेळी ममता बॅनर्जी आम्हाला बाहेरुन पाठिंबा देतील: शरद पवार
ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत नसल्या तरी सत्ता स्थापनेची वेळ आली तर त्या बाहेरून समर्थन करतील. माझा त्यांच्याशी संवाद आहे, असे शरद पवारांनी सांगितले. आज त्या इंडिया आघाडीत नाही मात्र माझे त्यांच्याशी संबंध आहे. माझा स्वतः त्यांच्याशी डायलॉग आहे. ममता बॅनर्जी नक्कीच सहकार्य करतील, असे शरद पवार यांनी सांगितले.
मोदींकडे सांगायला काही उरलं नाही म्हणून विषय भरकटवण्याचा प्रयत्न: शरद पवार
पंतप्रधान मोदी यांनी कल्याणमधील सभेत भाषण करताना काँग्रेस पक्षाने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे बजेट तयार केल्याचे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी म्हटले की, मोदींचं हे बोलणं योग्य नाही. बजेट हे कुठल्या जातीधर्माचं नसतं. देशाचे बजेट असते. मोदी बोलतात, ते कधीही होऊ शकत नाही. मोदींचा कॉन्फिडन्स ढासळला आहे. मोदींकडे काही सांगण्यासारखं शिल्लक नाही, त्यामुळे ते विषय भरकटवत आहेत. ते जे बोलत आहेत, त्यापैकी एक टक्कादेखील काही खरं नाही. जातीधर्माचा विचार करून देश चालत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
मोदींना व्हिसा नाकारला होता तेव्हा मी त्यांना इस्रायलला घेऊन गेलो होतो: शरद पवार
पंतप्रधान मोदी मी इतक्या वर्षात काय केलं, असा प्रश्न विचारतात. ते गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या राज्यातला शेतीचा कोणताही विषय राहिला तर ते माझ्याकडे यायचे. मी ही गुजरातला जायचो. मी एकदा इस्रायलला जात असताना मला मोदींचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, मला अमेरिकेचा व्हिसा नाकारला आहे. मला तुमच्यासोबत इस्रायलला येण्याची इच्छा आहे, मला घेऊन चला, असे ते म्हणाले. मी त्यांना घेऊन इस्रायलला गेलो. इस्रायलमध्ये शेतीतील प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि इतर गोष्टी मी त्यांना दाखवल्या. एवढं सगळं माहिती असूनही पंतप्रधान मोदी असं का बोलतात त्याचं कारण राजकारण आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)