एक्स्प्लोर

PM Modi: अयोध्येतील राममंदिर झाले, आता कैलासासाठी मोदींना मतदान करा, गुवाहाटीतील कामाख्या मंदिराच्या पुजाऱ्यांचं वक्तव्य

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा मतदान केल्यास कैलासाचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत गौरीश महाराज यांनी व्यक्त केले. सर्वधर्मीयांनी तिसऱ्यांदा कमळ बटन दाबून भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवावे.

मुंबई: भारताचे हिंदुत्व टिकवून ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी (PM Modi) हे महत्त्वाचे आहे. काही निर्णय घेण्यासाठी बहुमत नाही तर प्रचंड बहुमत लागते आणि ते महत्त्वाचे आहे. मी स्वत: दोनदा कमळाचे बटन दाबलं. मला प्रभू श्रीराम भेटले. मी तिसऱ्यांदा बटन दाबलं तर तर मला कैलाश भेटेल, असं म्हणत गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे(kamakhya temple) पुजारी असलेल्या गौरीश महाराज यांनी सर्वधर्मीयांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

कैलास पर्वत हे सर्वधर्मीयांचे महत्त्वाचे ठिकाण असून कैलासापर्यंत जाण्याचा मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. आता अवघा 20% मार्ग बाकी असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सर्वधर्मीयांनी तिसऱ्यांदा कमळ बटन दाबून भाजपला पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत बसवावे, असे आवाहन गौरीश महाराज यांनी केले आहे.

भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल: उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईतील सभेत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपकडून करण्यात येणाऱ्या प्रचारावर बोट ठेवले. भाजपकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा? भारतात की पाकिस्तानात? उद्धव ठाकरे यांनी हाच धागा पकडत म्हटले की, भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल, मोदीजी तुम्ही हरले तर भारतात जल्लोष होईल. काश्मीरमध्ये आजही हल्ले होत आहेत, मग तुम्ही 10 वर्ष काय खुर्च्या उबावताय. आता मोदीजी काय करताय? महागाई वर बोलताना दिसतात का? रोजगारावर बोलतात का? तर आता ते धर्माधर्मात तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अयोध्येतील राममंदिर पूर्ण झाले: राज ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कणकवली येथे सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची तारीफ केली होती. अयोध्येतील राम मंदिर हे फक्त पंतप्रधान मोदी आणि सर्वोच्च न्यायालयामुळे उभे राहू शकले. इतके वर्षे फक्त राममंदिर उभारणीच्या घोषणा आणि बाता सुरु होत्या. मात्र, मोदींमुळे राम मंदिराचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले. त्या मंदिरात रामलल्ला विराजमान झाला, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा

जय श्रीराम! अयोध्या ते काशी 5 प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट द्या, भारतीय रेल्वेकडून पुण्य मिळवण्याची संधी! स्वस्तात टूर पॅकेज पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Shivsena Opration Tiger : संजय जाधवांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, अष्टीकरांनाही इशारा, तर बीडमध्ये जाळपोळ, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक
संजय जाधवांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, अष्टीकरांनाही इशारा, तर बीडमध्ये जाळपोळ, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
मोठी बातमी: अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित!
मोठी बातमी : संजय दिना पाटलांनी खोटारडेपणाची हद्द गाठली, ईशान्य मुंबईपासून दिल्लीपर्यंत खोटं बोलून फुटले
मोठी बातमी : संजय दिना पाटलांनी खोटारडेपणाची हद्द गाठली, ईशान्य मुंबईपासून दिल्लीपर्यंत खोटं बोलून फुटले

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NDA Lok Sabha Number : तृणमूल पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेतील फूट अटळ,लोकसभेत एनडीएला 362 साठी किती खासदारांची गरज?
तृणमूल पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेतील फूट अटळ,लोकसभेत एनडीएला 362 साठी किती खासदारांची गरज?
Shivsena Opration Tiger Sharad Pawar And Uddhav Thackeray: 'ऑपरेशन टायगर'मध्ये शरद पवारांची एन्ट्री, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार, तर राडा घालण्याचा राऊतांचा निर्धार
'ऑपरेशन टायगर'मध्ये शरद पवारांची एन्ट्री, ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेणार, तर राडा घालण्याचा राऊतांचा निर्धार
US Iran Deal : अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, भारतात पेट्रोल डिझेल किती रुपयांना?
अमेरिका आणि इराण शांतता करारावर स्वाक्षरी,युद्ध संपताच क्रूड ऑईलचे दर गडगडले, चीन ते नेपाळपर्यंत दर घटले, भारतात काय?
US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले 'It's signed'
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Allu Arjun Song On PM Modi Post: PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..
PM मोदींच्या इन्स्टा पोस्टला अल्लू अर्जुनचं गाणं, चर्चांना जोरदार उधाण; स्वतः अभिनेत्याने दिली प्रतिक्रिया..
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Embed widget