(Source: ECI/ABP News/ABP Majha)
20 लाखांहून अधिक ग्राहक, IPO साठी अर्जही दाखल; चित्रा वाघ यांनी उल्लेख केलेला Ullu App आहे तरी काय?
ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराच्या संबंधीत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे, असा दावा भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरातील सर्व राजरीय पक्ष विविध मुद्द्यांवर जाहिरात करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडूनही विविध जाहिराती सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. यामध्ये ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधीत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याच जाहिरातीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाकडून महिला अत्याचाराच्या संबंधीत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच अशा कलाकाराला जाहिरातीमध्ये घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली?, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदत घेत ठाकरे गटावर हल्लाबोल केला.
उल्लू अॅप आहे तरी काय? (Ullu App)
कोरोना काळात Amazon Prime Video, Netflix, आणि Disney+Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्मने भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवली. यासोबतच उल्लू अॅप निःसंशयपणे भारतातील सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म बनले आहे. या अॅपवर अनेक बोल्ड वेब सीरिज आहेत. उल्लू अॅप अनेक वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म्सने भरलेले आहे. उल्लू ॲप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएसच्या कोणत्याही केवायसी पॉलिसी किंवा वय पडताळणी नियमांचे पालन करत नाही. प्ले स्टोअर आणि आयओएस मोबाइल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या 'उल्लू ॲप'मध्ये लहान मुलांसह ग्राहकांसाठी गुप्तपणे अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट उपलब्ध आहे.
उल्लूचे 20 लाखांहून अधिक ग्राहक-
एनसीपीसीआरने उल्लू विरुद्ध हे पाऊल तेव्हा उचलंय आहे जेव्हा त्यांनी BSE SME कडे 150 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ड्राफ्ट दाखल केला आहे. मोठ्या पडद्यासाठी कॉन्टेंट तयार करण्यासाठी आणि नंतर छोट्या पडद्यावर आणण्यासाठी आयपीओमधून 30 कोटी रुपये वापरण्याची उल्लूची योजना आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 31 कोटी रुपयांचे कॉन्टेंट खरेदी केले जे आर्थिक वर्ष 2022 मध्ये 26.5 कोटी रुपयांवर होती. या कालावधीत त्यांचा प्रोडक्शनचा खर्च 3.7 कोटी रुपयांवरून 9.5 कोटी रुपयांवर गेला. उल्लूचं सबस्क्रिप्शन 2020 मध्ये वार्षिक 198 रुपयांवरून आता 459 रुपयांवर गेलं आहे. उल्लूचे 20 लाखांहून अधिक ग्राहक आहेत.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची तक्रार-
आयपीओची तयारी करत असलेल्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म Ullu ला त्याच्या कॉन्टेंटमुळे मोठा झटका बसला आहे. उल्लू त्याच्या प्लॅटफॉर्मवर अडल्ट मुव्हीज आणि चित्रपट ऑफर करते. आता या कॉन्टेंटमुळे, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं (NCPCR) त्याविरोधात तक्रार केली आहे. लहान मुलांच्या अधिकारांशी निगडीत या संस्थेनं, लहान मुलांना अडल्ट कॉन्टेंट सहजरित्य अॅक्सेस करू देणं आणि शालेय मुलांना अडल्ट कॉन्टेंट दाखवण्याविरुद्ध कारवाई करण्यास सांगितलं आहे.