Yugendra Pawar: मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन कोणीही काढू शकत नाही; युगेंद्र पवार अजितदादांचा डाव पलटवणार?
Baramati News:लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच युगेंद्र पवार यांची बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्याने चर्चांना उधाण आले होते. शरद पवार गट आणि अजित पवार गटात पुन्हा वाद होणार?
![Yugendra Pawar: मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन कोणीही काढू शकत नाही; युगेंद्र पवार अजितदादांचा डाव पलटवणार? no one can remove me from baramati kustigir parishad Chairman post Yugendra Pawar oppose Ajit Pawar political move Yugendra Pawar: मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन कोणीही काढू शकत नाही; युगेंद्र पवार अजितदादांचा डाव पलटवणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/ece74367ffb4a140f780e772dfd6ce031717655572142954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बारामती: लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरणाऱ्या युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात आता नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामती (Baramati) तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा होती. ही सगळी सूत्रे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामार्फत हलवल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.
बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्ताने मैदानी कुस्तीचे आयोजन केले आहे. पण खरे मैदान आम्ही घेतो आणि घेत राहणार. मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवले, अशी चर्चा आहे. पण माझ्या वकिलांनी मला सांगितले आहे की, तु्म्हाला असं कोणीही अध्यक्षपदावरुन काढू शकत नाही. हा खेळ आहे,यामध्ये राजकारण आणले नाही पाहिजे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. परवा बारामतीमध्ये अजित पवारांचा मेळावा झाला, तो त्यांच्या पक्षाचा मेळावा होता. परंतु कसा झाला ते आपण सगळ्यांनी पाहिलं, असेही युगेंद्र पवार यांनी म्हटले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रम स्थळाची पाहणी युगेंद्र पवार यांनी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यंदा अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, भूषण होळकर येणार आहेत. यापूर्वी शरद पवारांच्या उपस्थित जयंती साजरी केली जायची, त्यांना कार्यक्रमांचं आमंत्रण असायचं. गेल्यावर्षी याठिकाणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणण्यात आले होते. पण बदललेल्या राजकारणामुळे पवार साहेबांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. मग साहेब कसे जयंतीला जाणार? म्हणून काही लोकांनी मिळून जयंतीचे आयोजन केले आहे. अहिल्याबाई होळकर या पुरोगामी विचारांच्या होत्या आणि साहेब देखील पुरोगामी विचाराचे आहेत, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)