बारामतीत नणंद भावजंयची लढत झाली आता पुन्हा काका-पुतण्या भिडण्याची चिन्हं, युगेंद्र पवार विधानसभा लढवणार?
Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय (Supriya Sule vs Sunetra Pawar) सामना पाहिला. आता विधानसभेला (Vidhan Sabha Election) काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बारामतीत होणार का?
Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय (Supriya Sule vs Sunetra Pawar) सामना पाहिला. आता विधानसभेला (Vidhan Sabha Election) काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बारामतीत होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. बारामतीतून विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार (Ajit Pawar vs yugendra pawar) उभा राहणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे तसेच कार्यकर्त्यांनी देखील युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी शरद पवारांकडे केली.
आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांना भेटले आणि मागणी केली आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे. आता एक दादा नको म्हटल्यावर दुसरा कोणता दादा असेल याची उत्सुकता तुम्हाला देखील असेल, तर त्याच उत्तर आहे युगेंद्र दादा होय. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत. हाच पुतण्या अजित पवारांना आगामी विधानसभेत आव्हान देणार असल्याची चर्चा सुरू आहे
युगेंद्र पवारांची राजकारणात इन्ट्री होणार ?
कार्यकर्त्यांनी शरद पवारांची बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेऊन युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसापासून युगेंद्र पवार बारामतीत चांगलेच एकटिव्ह झाले आहेत. दर मंगळवारी युगेंद्र पवार बारामतीत दौरा करीत जनता दरबार घेत असतात.
त्यांच्या दरबाराला देखील चांगला प्रतिसाद आहे.. त्यामुळे आता ही युगेंद्र पवारांची राजकारणात इन्ट्री होणार का याची चर्चा आहे का?
कोण आहेत युगेंद्र पवार?
अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे युगेंद्र पवार अध्यक्ष आहेत, सध्या त्यांना त्या पदावरून काढल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले होते.
लोकसभेला सुप्रिया सुळेंचा प्रचार केला
याआधी बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत उभ्या महाराष्ट्राने पाहिली. याच निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला आणि अजित पवारांचे कुटुंब एका बाजूला अशी परिस्थिती होती. युगेंद्र पवारांनी काकांची साथ सोडून शरद पवारांची साथ धरली आणि बारामतीत अत्याचा प्रचार केला आणि आत्याला निवडून देखील आणले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ अजित पवारांच्या विरोधात शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवारांनी प्रचार केला.
युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळणार का?
बहिणी विरुद्ध भावजयला उभं केल्याने श्रीनिवास पवारांच्या कुटुंबांने सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पवार कुटुंबातीलच व्यक्ती एकमेकांवर टीका करू लागले. आणि त्यांना निवडून देखील आणलं. परंतु आता ही लढाई वेगळ्या मार्गावरती आहे. श्रीनिवास पवारांनी काही दिवसापूर्वी जाहीर केलं होतं, जो शरद पवार जो उमेदवार देतील त्याचा मी प्रचार करेल. आता कार्यकर्त्यांच्या मागणीवरून शरद पवार हे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.