एक्स्प्लोर

उबाठा अन् मविआची गावं टार्गेट करा, तिकडे कशाला राहताय निधी मिळणार नाही सांगा, गाडीत बसवून पट्टे घालून घ्या विषय संपवा : नितेश राणे

Nitesh Rane : मविआच्या काळात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न झाल्याचं नितेश राणे म्हणाले. कर्जाची परतफेड व्याजासह करणार असल्याचं राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग :  भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमात बोलताना निधी वाटपासंदर्भात पुन्हा एक वक्तव्य केलं आहे.  एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षात पहिल्या आठवड्यात नवीन वर्षाची यादी घेऊन बसणार आहे.  सरपंचांची यादी मी घेउन बसणार आहे. चला ठीक आहे भाजप 100 टक्के, उबाठा शून्य टक्के निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही, असं नितेश राणे म्हणाले.  आपल्याला काही फरक पडत नाही, असंही ते म्हणाले.  

कर्जाची व्याजासह परतफेड करणार

भाजप वाढला पाहिजे ही भूमिका आहे. आपण दबाव टाकतो दबाव घेत नाही. सगळा विषय क्लिअर आहे. आता आपण एसईओची यादी तयार करणार आहोत. यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली नावं जिल्हाध्यक्षांकडे द्यावीत. संधीचं सोनं करा बोंबलत बसू नका. आता तुमची सत्ता आलेली आहे. समित्या, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. पदांमध्ये प्राधान्य दिलं जाईल, संधीच सोन करा असं आवाहन राणेंनी कार्यकर्त्यांना केलं. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय वेगळं केलेलं. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही सगळेजण विरोधी पक्षात होतो. देवेंद्र फडणवीस यांना अटक करेपर्यंत यांची हिंमत झालेली, विचारा आमच्या सदस्यांना असं नितेश राणे म्हणाले. आमदार म्हणून तेव्हा महाविकास आघाडीच्या काळात कणकवली विधानसभेची यादी पाठवायचो, 80 ते 90 टक्के यादी बदलून टाकायचे. काम द्यायचे नाहीत, पदं द्यायचे नाहीत हा सगळा अनुभव महाविकास आघाडीच्या काळात घेतले. सगळ्या प्रकल्पांना स्थगिती देत बसले, ज्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता तेच औषध तुम्हाला जेव्हा पाजतोय तेव्हा का दुखतंय.  तुम्ही काय वेगळं औषध पाजलं काय? आता तुम्हाला वाटतं अन्याय आहे, ह्याला काय त्याची शपथ आठवते काय? तुमचा उद्धव ठाकरे काय गझनी झालेला काय, त्याला शपथ आठवत नव्हती. तुम्ही जो न्याय दिला तो आम्ही न्याय देणार,असं  नितेश राणे म्हणाले. 

आमच्या लोकांना किती  आत टाकलं, विचारा आमच्या मनीषजींना , महाविकास आघाडीच्या काळात माझा 31 डिसेंबर कुठं गेला हे मला अन् मनीषजींना माहिती आहे. आता वेळ यांची होणार, यांना जंगल दाखवायला लागणार. कर्ज घेतलं तर व्याजासह परतफेड  करणार आहोत. मी पालकमंत्री झालो म्हणून काहीजण गोव्यात जात आहे. मालमत्ता विकत आहेत. पण, गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं असा इशारा नितेश राणेंनी दिला. आम्ही हे सर्व का करतोय भाजप मजबूत झाला पाहिजे, असं ते म्हणाले.

उबाठा अन् मविआच्या गावाला टार्गेट करा : नितेश राणे

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी दिवसरात्र काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना काम करताना बघतोय. नरेंद्र मोदी देशाला महासत्ता काम करण्यासाठी काम करत आहेत. घरकुलाच्या यादीला देवेंद्र फडणवीसांना एका मिनिटात मान्यता दिली. सगळे लाभ भाजपच्या माध्यमातून भेटत आहेत तर दुसरीकडे जाण्याची गरज नाही.  आज जे कार्यकर्ते आलेत त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.  महेश आणि मनीषजी माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगेन प्रत्येक उबाठाच्या आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा. जावा तिकडे कशाला राहताय तुम्ही तुम्हाला एक रुपयाचा विकास निधी मिळणार नाही. चला गाडीत बसा पट्टे घालून घ्या अन् विषय संपवा,100 टक्के सांवतवाडी मतदारसंघात भाजप गावागावात असला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले. 

इतर बातम्या : 

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget