Nitesh Rane on Manoj Jarange : जरांगेंना पहिल्या दिवसापासून सांगतोय राजकीय टीका करु नका, नितेश राणे जरांगेंविरोधात कडाडले
Nitesh Rane on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांना पहिल्या दिवसापासून सांगतोय राजकीय टीका करु नका. आंदोलन कुठेही भरकटता कामा नये, अशीच आमची इच्छा आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली तेव्हा सभा उधळून लावण्याची भाषा केली गेली.
Nitesh Rane on Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांना पहिल्या दिवसापासून सांगतोय राजकीय टीका करु नका. आंदोलन कुठेही भरकटता कामा नये, अशीच आमची इच्छा आहे. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका झाली तेव्हा सभा उधळून लावण्याची भाषा केली गेली. तेव्हा नारायण राणे यांनी वडिलकीच्या नात्याने आपल्याला उत्तर दिले आहे, असे भाजप नेते नितेश राणे म्हणाले. मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पीएम मोदींवर भाष्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता नितेश राणेही मैदानात उतरले आहेत. राजकीय टीका करु नका, असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलाय.
मराठा आरक्षणासाठी संघर्ष केल्या आणि लढलोयही
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबियांनी मराठा समाजासाठी काय केलं? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. समाजासाठी काही करु शकलो तर ते आम्ही आमचे कर्तव्य मानतो. मराठा स्वतःच्या हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे हीच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे. यासाठी आम्ही सहभाग घेतलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्हीही संघर्ष केलाय. फक्त पहिल्या दिवसापासून मी जरागेंना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करु नका, असे आवाहन नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना केले आहे.
काही दिवसांत मराठा समाजाला आरक्षण मिळेल
आपण जबाबदारीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रवास अंतिम टप्प्यावर घेऊन गेलेलो आहोत. काही दिवसात मराठा समाजाला स्वतःचं हक्काचे आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. समाज बांधव म्हणून जरांगे यांना आणि सहकार्यांना सांगेन आपल्यात एकजूट कायम ठेवण्याच काम केले पाहिजे. राणे कुटूंब म्हणून आम्ही आजही समाजासोबत आहोत आणि कायम राहू, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जरांगेंवर उपचार सुरु
मराठा आंदोलक जरांगे-पाटील वैद्यकीय उचार घेण्यास नकार देत होते. मात्र, गुरुवारी (दि.16) उच्च न्यायालयाने त्यांना उपचार घेण्याचे आदेस दिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याच्यावर जालन्यात उपोषणस्थळी उपचार सुरु करण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरु केले होत.दरम्यान, गुरुवारी त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्याच्या नाकातून रक्त पडण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत होता. अशक्तपणामुळे जरांगेंना ग्लानी आली होती. एवढं काही असतानाही जरांगे उपचार आणि पाणी घेण्यास मनाई करत होते, त्यामुळे राज्य सरकारने न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Mahesh Gaikwad : महेश गायकवाड यांचा डिस्चार्ज रद्द, डॉक्टरांनी कारण सांगितलं!