एक्स्प्लोर

औरंग्याच्या थडग्यावर डोकं टेकवणारे आम्हाला संविधान शिकवणार? निलेश राणेंचा इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल

Nilesh Rane on Imtiaz Jaleel : एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

सिंधुदुर्ग : महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यानंतर नाशिक (Nashik), छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhajinagar) राज्यातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात प्रक्षोभक वक्तव्य केले. या विरोधात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांची तिरंगा रॅली मुंबईकडे रवाना झाली आहेत. यावरून आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

छत्रपती संभाजीनगरवरून इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली तिरंगा रॅली नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिकहून शेकडो गाड्यांचा ताफा तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. इम्तियाज जलील हे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या संविधानाची प्रत देणार आहे. यावरूनच निलेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना डिवचले आहे. 

निलेश राणे यांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका 

इम्तियाज जलील यांच्या नावातच जलील आहे, हे आम्हाला संविधान शिकवणार. इम्तियाज जलील यांना जन गन मन म्हणायला सांगा. यांना भारत माता की जय म्हणायला सांगा आणि मग रॅली काढायला सांगा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस बघतील. यांनी केव्हा कायदा व सुव्यवस्था पाळली. औरंग्याच्या थडग्यावर डोकं टेकवणारे देश आणि संविधान आम्हाला शिकवणार? हा माणूस खरच भारतीय असेल तर पहिले जन गण मन म्हणून दाखवायला सांगा. तू या देशापेक्षा पाकिस्तानचा जास्त वाटतो, तुम्ही भारतीय असल्याचा आमचा आक्षेप असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे. 

मी लढणारा आहे, मागे हटणार नाही : इम्तियाज जलील

दरम्यान, इगतपुरी येथे इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रामगिरी महाराज हे भोंदू बाबा आहेत. त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. भाजप आमदार नितेश राणेंवर सरकार कारवाई करत नाही. मला मुंबईत बोलावले, मी येतोय, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारने काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना पाठीशी घालतात. रामगिरी महाराजांना मुख्यमंत्री आश्रय देतात. मी लढणारा आहे, मागे हटणार नाही. भाजप आमदार हे फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू आहेत. मी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या मुस्लिम नेत्यांसारखा नाही. हजारो मुस्लिम बांधवांच्या सोबत मी मुंबईत जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारताच्या संविधानाची प्रत देणार आहे.  निवडणुका लढण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी जातीय वाद सुरू आहे याला सरकारच जबाबदार आहे. पोलीस आमच्यावर दबाव टाकत आहेत. आता पुढची जबाबदारी त्यांची आहे, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

नितेशला न्याय वेगळा असे का? इम्तियाज जलील यांचा सवाल, मुस्लिमविरोधी वक्तव्यावर जलील यांची चलो मुंबई तिरंगा रॅली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
नगरविकास गृहनिर्माण ते पर्यटन, आरोग्य...; शिवसेनेच्या वाट्याला 12 खाती, गृहमंत्रिपद कोणाला?
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान नको; आदित्य ठाकरेंनी घेतलं तिघांचं नाव; नागपुरातील विस्तारावर पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच छगन भुजबळ नाराज? पक्षाच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Mahayuti Government Minister : पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन्  मुंबईतून फक्त दोन मंत्री
पुणे अन् साताऱ्याची बाजी! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 16 जिल्ह्यांची पाटी कोरी अन् मुंबईतून फक्त दोन मंत्री
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
होय, मी शपथ घेणार..; दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळताच पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar NCP Minister List : दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
दिलीप वळसे पाटलांचं अजूनही ठरेना, पण अजितदादांनी शब्द पाळत एक सरप्राईज चेहरा दिला!
Paschim Maharashtra Minister In Mayauti Government : महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
महायुती सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा 'एकच आवाज'! सहकार पंढरीत तिन्ही पक्षांकडून मंत्रिपदात झुकते माप, सातारमध्ये तब्बल चौघांना संधी
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Embed widget