Nilesh lanke : अजित पवार गटाला पहिला धक्का! निलेश लंकेंनी साथ सोडली, शरद पवार गटात करणार प्रवेश
Nilesh Lanke To Join Sharad Pawar : निलेश लंके हे लोकसभेसाठी इच्छुक असून ते भाजपच्या सुजय विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
![Nilesh lanke : अजित पवार गटाला पहिला धक्का! निलेश लंकेंनी साथ सोडली, शरद पवार गटात करणार प्रवेश nilesh lanke to join ncp sharad pawar big setback to ajit pawar Ahmednagar Lok sabha Election vs Sujay Vikhe Patil nagar politics maharashtra marathi Nilesh lanke : अजित पवार गटाला पहिला धक्का! निलेश लंकेंनी साथ सोडली, शरद पवार गटात करणार प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/2c6f87197c9b6dad79cc941c7a7d53ed171013020983693_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला (Ajit Pawar) मोठा धक्का बसला असून आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे लवकरच शरद पवार (Sharad Pawar) गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुजय विखे पाटील अशी लढत होणार हे नक्की झालंय.
निलेश लंके हे पारनेरचे आमदार असून अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिण अहमदनगरमधून ते लोकसभेसाठी इच्छुक होते. पण अजित पवार गटाला तीन ते चारच जागा मिळण्याच्या चर्चेमुळे त्यांची चांगलीच अडचण झाली होती. आता शरद पवारांची साथ दिल्यानंतर ते लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.
लोकनेते लवकर निर्णय घ्या, अमोल कोल्हेंची साद
लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा अशी साद काहीच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना घातली होती. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटासोबत असलेल्या निलेश लंके यांच्या पोस्टर्सवर शरद पवारांचाही फोटो झळकत असल्याचं दिसून येतंय. त्यातच त्यांनी पारनेरमध्ये शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका असलेल्या महानाट्याचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांनी शरद पवार गटात येण्याचं आवाहन केलं होतं.
लंके यांच्या पत्नी नगरमध्ये सक्रिय
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. पण यामध्ये अहमदनगर मतदारसंघाची चांगलीच चर्चा आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय होताना दिसत आहेत.
खा.सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखेही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे आ. निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)