राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकषच ग्राह्य धरता येईल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य
NCP Crisis: सर्वोच्च न्यायालय, विधिमंडळातील नोंदी, आणि दोन्ही गटांनी सादर केलेली कागदपत्रे या आधारे मी निर्णय घेतला. यासाठी तीन निकष होते.
![राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकषच ग्राह्य धरता येईल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य NCP Crisis Ajit Pawar camp Vs Sharad Pawar Camp Vidhansabha Speaker Rahul Narvekar Verdict राष्ट्रवादी पक्ष कोणाचा ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हा एकमेव निकषच ग्राह्य धरता येईल, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/11/d4b5b438dd0af82b0d2509ed817daae51704964691772265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटात सुरु असलेल्या आणखी एका कायदेशीर लढाईचा निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि कोणत्या गटाचे आमदार पात्र किंवा अपात्र ठरणार, याबाबत सविस्तरपणे निकाल मांडला. निकालाचे वाचन करताना विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी विधिमंडळातील बहुमत हाच निकष ग्राह्य धरला. या निकषानुसार अजित पवार गटाकडे जास्त आमदार असल्यामुळे तोच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?
माझ्यासमोर एकूण पाच याचिकांची सुनावणी झाली. या याचिकांवर निकाल देताना मी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शनक तत्त्वांचे पालन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हे ठरवण्यासाठी माझ्याकडे तीन निकष होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना, नेतृत्त्व रचना, विधिमंडळातील बहुमत, असे हे तीन निकष होते. त्याआधारे खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता हे ठरवायचे होते. हा निकाल देताना मी सर्वोच्च न्यायालय, विधिमंडळातील नोंदी, आणि दोन्ही गटांनी सादर केलेली कागदपत्रे विचारात घेतली. मात्र, कायेदशीर निकष पूर्ण झाले नसल्याने पक्षाची घटना, नेतृत्त्व रचना या दोन कसोट्या याप्रकरणात लागू होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हा निर्णय विधिमंडळातील बहुमत या एकमेव निकषावर ठरवणे शक्य आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच: नार्वेकर
मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे.
शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचीच आहे. अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा
आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)