एक्स्प्लोर

Navneet Rana News : आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? नवनीत राणांविरोधात कारवाई होत नसल्याने शिवडी कोर्टाची विचारणा

Navneet Rana News : नवनीत राणा यांच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला. यावर नाराजी व्यक्त करत शिवडी कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले.

Navneet Rana News : बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र (Bogus Caste Verification Certificate) प्रकरणी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने मुंबईतील शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने (Sewri Court) नाराजी व्यक्त केली आहे. नवनीत राणा यांच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड पोलीस (Mulund Police) ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला. यावर नाराजी व्यक्त करत शिवडी कोर्टाने काही प्रश्न उपस्थित केले. 'न्यायालयाच्या आदेशांचं पालन होताना इथे दिसत नाही' असं म्हणत कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असे प्रश्न न्यायालयाने पोलिसांना विचारले. आता नवनीत राणा यांच्या प्रकरणात पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

नवनीत राणा यांच्यावर आरोप काय? 

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने (Sewri Court) या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना (Mulund Police) कारवाईचे आदेश जारी केले आहेत. नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्यानं शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आणखी वेळ मागितल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती? 

अमरावतीच्या (Amaravti) खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी रद्द केलं. शिवाय त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका 2017 मध्ये उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यानंतर हायकोर्टाने निर्णय देत जातप्रमाणपत्र रद्द केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. 22 जून 2021 रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नवनीत कौर राणा यांना दिलासा देत जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
Maharashtra LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..
चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..
Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
Maharashtra LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
LIVE Updates: मुंबईत आजपासून ओबीसी नेते एकटवणार, पुढील दोन दिवस महत्त्वाच्या बैठका
Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..
चंद्रग्रहणानंतर अखेर 'या' 3 राशींच्या नशीबाचे दार उघडले! नोकरीत पगारवाढ, बक्कळ पैसा हाती, श्रीमंतीचे योग..
Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
OBC Reservation: मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले, मुंबईत महत्त्वाच्या बैठका, लक्ष्मण हाकेंकडून राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी
मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले, मुंबईत महत्त्वाच्या बैठका, लक्ष्मण हाकेंकडून राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी
Instagram Earning : 1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?
1000 Views ला इन्स्टाग्रामकडून किती पैसे मिळतात? जाणून घ्या क्रिएटर्स कशी कमाई करतात?
lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
Embed widget