एक्स्प्लोर
राज ठाकरे सपत्नीक 'वर्षा' बंगल्यावर, बाप्पांचे दर्शन; मुख्यमंत्र्यांसोबत 15 दिवसांत तिसरी भेट
Raj Thackeray: राज्यात काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच, मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमवेतच्याही गाठीभेटी चर्चेत आहेत.
Raj Thackeray meet devendra Fadnavis
1/7

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढवलेल्या गाठीभेटीही चर्चेत आहेत.
2/7

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या गाठीभेट होत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही सातत्याने भेट होत आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.
3/7

सध्या गणेशोत्सव असून गणपतीच्या दर्शनाला येण्याची पद्धत मुंबईत आहे, त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट देत मुख्यमंत्री फडणवीसांनी गणरायाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे, काही दिवसांतच ही त्यांची दुसरी भेट ठरली.
4/7

आता, राज ठाकरे यांनी सपत्नीक वर्षा निवासस्थानी भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. मात्र, चर्चेचा वृत्तांत समोर आला नाही.
5/7

विशेष म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची 12 जून रोजी वांद्र येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली होती.
6/7

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असताना फडणवीस आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटी वाढल्या असून 15 दिवसांतच ही त्यांची तिसऱ्यांदा भेट आहे.
7/7

मुंबईत बेस्ट पतसंस्थेच्या निवडणूक निकालाच्या दुसऱ्याचदिवशी 21 ऑगस्ट रोजी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना अचानक भेटायला गेले होते, तेव्हा मुंबई शहरातील काही महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
Published at : 03 Sep 2025 07:03 PM (IST)
आणखी पाहा























