एक्स्प्लोर

lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींना फोन केला आहे. दिवसभरात काय अडचणी आल्या त्याची माहिती त्यांनी घेतली.

मुंबई : लालबागचा राजाचं विसर्जन समुद्राला भरती येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरु होऊन तीस तास उलटून गेल्यानंतर देखील विसर्जन होऊ शकलेलं नाही. लालबागचा राजा मंडळाकडून अत्याधुनिक तराफा या वर्षी विसर्जनासाठी तयार करण्यात आला आहे. त्या तराफ्यावर लालबागचा राजा रथावरुन घेण्यात आज दुपारी साडे चार वाजता यश आलं. आज रात्री साडे दहा नंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, अशी माहिती मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांनी फोन करुन विचारपूस केली आहे. 

उद्धव ठाकरेंचा सुधीर साळवींना फोन

उद्धव ठाकरे यांनी लालबागचा राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना फोन करून विचारपूस केली आहे.  आज दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात आलेल्या अडचणी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळीव यांच्यासोबत चर्चा केली.  
तसेच सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

मंडळाचे पदाधिकारी काय म्हणाले?

लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी रात्री 10 ते 11 वाजता भरतीची वेळ आहे. आमचे कोळी बांधव आमच्यासोबत आहेत. आरती झाल्यानंतर रात्री साडे दहा नंतर स्वयंचलित तरफा खोल समुद्रात जाईल आणि विसर्जन होईल. विसर्जनापूर्वीची आरतीची परंपरा आहे, त्यानुसार लालबागच्या राजा समुद्रकिनारी येत असतो, त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते आरती होईल, त्यानंतर बाप्पा मार्गस्थ होतील, असं बाबासाहेब कांबळे म्हणाले.

सुधीर साळवी काय म्हणाले?

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा अत्याधुनिक तराफा तयार करण्यात आला आहे. लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळा भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. आम्ही इथं येण्यापूर्वी भरती आली होती. आम्ही एक प्रयत्न करुन बघितला होता. मात्र, लालबागचा राजा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असल्यानं आम्ही तो प्रयत्न थांबवला. ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो. त्यानंतर भरतीच्या वेळी तराफ्यावरुन विसर्जन केलं जातं, असं सुधीर साळवी म्हणाले.  उशिरा झालेल्या विसर्जनामुळे मी मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. लालबागचा राजा लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. पोलीस, महापालिका, माध्यमांचे आभार मानतो, असं सुधीर साळवींनी म्हटलं.  कोळी बांधवांसोबत केलेल्या चर्चेनुसार रात्री साडे दहानंतर विसर्जन होईल, असं सुधीर साळवी यांनी सांगितलं. कोळी बांधव गेल्या 24 वर्षांपासून विसर्जनात सहभागी होतात, असंही साळवी म्हणाले.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
Maharashtra Live News Updates: गेल्यावर्षी मांजरा नदीला महापूर, यंदा पात्र भेगाळलेलं; सांगली जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नको, अन्यथा...; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात सुनेत्रा पवारांना अडचण?, भाजपला कोणता प्रस्ताव दिला?, वेगळीच माहिती समोर
Vasai-Virar Railway Accident News: वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वसई-विरार रेल्वे मार्गावर मृत्यूचे सत्र! अवघ्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेगळं वेळण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून NDA प्रवेशाची चाचपणी, नेमकं काय काय घडतंय?
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
Embed widget