Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या बलात्कारी नातवाला जेलमध्ये लायब्ररी क्लर्कची नोकरी, रोज 522 रुपये मानधन
Prajwal Revanna Case : शेकडो महिलांवर बलात्कार करून त्याचे व्हिडीओ बनवल्याचा आरोप प्रज्वल रेवन्नावर आहे.या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Prajwal Revanna Rape Case : माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांचा नातू आणि बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगणारा माजी खासदार प्रज्वल रेवन्नावर (Prajwal Revanna) जेलमध्ये एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्ना आता बंगळुरुमधील पैरप्पाना अग्रहरी जेलमध्ये (Parappana Agrahara Prison) लायब्ररी क्लर्क म्हणून काम करणार आहे. त्यासाठी त्याला रोज 522 रुपयांचे वेतनही देण्यात येणार आहे. प्रज्वल रेवन्ना याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप असून त्याला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
कारावासात लागू असलेली काम प्रणाली
जेल प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्नाची मुख्य जबाबदारी ही इतर कैद्यांना पुस्तके देणे आणि त्याची नोंद ठेवणे ही असेल. जेल नियमांनुसार, आयुष्यभराची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी काही प्रकारचे काम करणे बंधनकारक आहे. या कामांची निवड त्यांच्या कौशल्य आणि स्वेच्छेवर आधारित केली जाते. कैद्यांनी दर आठवड्यात साधारणतः 3 दिवस, म्हणजे दर महिन्याला 12 दिवस, काम करावे लागते.
मर्यादित दिवसांसाठी काम
प्रज्वल रेवन्ना याने सुरुवातीला प्रशासकीय (administrative) कामात रुची दर्शवली होती. मात्र प्रशासनाने त्याला लायब्ररी कर्मचाऱ्याचे काम दिले. रेवन्नाने पहिल्या दिवशी योग्य पद्धतीने काम केल्याची नोंद आहे. त्याच्या वेळापत्रकात असलेल्या कोर्टची सुनावणी आणि तज्ज्ञांशी संवाद यांसारख्या कामांच्या व्यस्ततेमुळे सध्या त्याला मर्यादित दिवसांसाठीच त्यांना काम दिले जात आहे.
न्यायालयीन निकाल आणि दोष
प्रज्वल रेवन्ना याला आयपीसी कलम (Sections 376(2)(k), 376(2)(n)) आणि 354(B), 354(C), 66(E) IT Act अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणात पुरावे, तपास आणि साक्षीदारांच्या साक्षीनुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय 10 लाख दंडाचीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांपैकी सात लाख पीडितेकरिता हक्क म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहे.
Who Is Prajwal Revanna : कोण आहे प्रज्वल रेवण्णा?
प्रज्वल रेवण्णा माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू आहेत तर त्याचे वडील कुमारस्वामी सध्या केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत. 24 एप्रिल 2024 रोजी हासनच्या स्टेडियमवर शेकडो पेन ड्राइव्ह सापडल्याने खळबड उडाली होती. या पेन ड्राइव्हमध्ये प्रज्वल रेवण्णांचे दोन हजार आठशे सत्तर व्हिडीओ क्लिप्स आणि फोटो होते. या व्हिडीओत त्याने अनेक महिलांसोबतचे शरीरसंबंध ठेवल्याचं समोर आलं. त्यानंतर, याप्रकरणी पन्नास महिलांच्या तक्रारी आल्या. बारा महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला.
व्हिडीओ समोर येताच रेवण्णा भारताबाहेर निघून गेला होता. 31 मे रोजी जर्मनीतून भारतात येताच त्याला अटक करण्यात आली. या खटल्यात 26 साक्षीदार, शेकडो कागदपत्रे आणि अडतीस सुनावण्या झाल्या. त्यामध्ये प्रज्वल रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
ही बातमी वाचा:























