'सलमान खान गुंड, घाणेरडा माणूस...'; 'दबंग'च्या दिग्दर्शकांचे भाईजानवर घाणेरडे आरोप, खान फॅमिलीबाबतही अनेक खळबळजनक खुलासे
Dabangg Director Abhinav Kashyap On Salman Khan: 2010 मध्ये 'दबंग' सिनेम प्रदर्शित झाल्यानंतर अभिनव कश्यप यांचं सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबाशी मोठं भांडण झालं.

Dabangg Director Abhinav Kashyap On Salman Khan: 'दबंग' चित्रपटाच्या (Dabangg Movie) 15व्या वर्धापन दिनानिमित्त, चित्रपट निर्माते अभिनव कश्यप (Director Abhinav Kashyap) यांनी पुन्हा एकदा सुपरस्टार सलमान खान (Superstar Salman Khan) आणि त्याच्या कुटुंबाशी असलेल्या कटू मतभेदांबद्दल उघडपणे भाष्य केलंय. 2010 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी आरोप केला आहे की, 'दबंग 2'चं (Dabangg 2) दिग्दर्शन करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तोडफोड मोहीम सुरू करण्यात आली होती.
'दबंग' चित्रपटात बॉलिवूड (Bollywood News) सुपरस्टार सलमान खानला पोलिसांच्या भूमिकेत पाहून चाहते खूप प्रभावित झालेले. आता त्याच 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी भाईजानवर एक नाही, तर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनव यांनी दावा केला आहे की, सलमान खान खऱ्या आयुष्यात 'गुंड' आणि खूपच 'असभ्य' आहे. 'दबंग' दिग्दर्शकानं असंही म्हटलं की, सलमान खानला अभिनयात अजिबात रस नाही.
2010 मध्ये 'दबंग' सिनेम प्रदर्शित झाल्यानंतर अभिनव कश्यप यांचं सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबाशी मोठं भांडण झालं. अभिनव यांनी त्यावेळी आरोप केला होता की, जेव्हा त्यांनी 'दबंग 2' दिग्दर्शित करण्यास नकार दिला, तेव्हा खान कुटुंबानं त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, सलमान खान याबद्दल कधीही उघडपणे बोलला नाही. आता पुन्हा एकदा अभिनव कश्यप यांनी सलमान खान आणि खान कुटुंबाबद्दल अनेक मोठे दावे केले आहेत.
View this post on Instagram
"सलमान खान एक असभ्य, घाणेरडा माणूस..."
इंडियन एक्सप्रेसला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत बोलताना दबंग दिग्दर्शक अभिनव कश्यप म्हणाले की, "सलमान खान कधीही यात सहभागी होत नाही. त्याला अभिनयात अजिबात रस नाही आणि गेल्या 25 वर्षांपासून तो अभिनय अजिबात करत नाही. तो कामावर येऊन आपल्यावरच उपकार करतो. त्याला अभिनयापेक्षा सेलिब्रिटी बनण्यात जास्त रस आहे, पण त्याला अभिनयात रस नाही... तो एक गुंड आहे. 'दबंग'पूर्वी मला याबद्दल माहिती नव्हती. सलमान एक असभ्य आणि घाणेरडा माणूस आहे."
"ते सूड घेणारे लोक..."
अभिनव कश्यपनं सलमान खान तसेच संपूर्ण खान कुटुंबाबद्दल मोठे दावे केले. 'दबंग' दिग्दर्शक म्हणाला की, "तो (सलमान खान) बॉलिवूडमधील स्टार सिस्टीमचा जनक आहे. तो 50 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये असलेल्या एका कुटुंबातील आहे. तो ही प्रक्रिया सांभाळतोय. तो एक सूड घेणारा माणूस आहे... तो संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतो. जर तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तर, तो तुमच्या मागेच लागतो, अजिबात सोडत नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























