एक्स्प्लोर

Sharad Pawar Group : शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होणार; सातारा, माढामधून रिंगणात कोण?

Sharad Pawar Group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar 2nd List For Lok Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) उमेदवारांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे, तर आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीत रावेर (Raver), भिवंडी (Bhiwandi), बीड (Beed), माढा (Madha) आणि सातारा (Satara) या पाच जागांचे उमेदवार दुसऱ्या यादीतून जाहीर होण्याची शक्यता आहे.  

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी (मंगळावारी) जाहीर केली. लोकसभेच्या 5 उमेदवारांची घोषणा पहिल्या यादीतून करण्यात आली. आज शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीतून 5 लोकसभा जागांवरील उमेदवारींची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून दुसरी यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत कोणाला उमेदवारी? 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके, वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. 

साताऱ्यातून श्रीनिवास पाटलांनीच लढावं, शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका 

सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढणार आहे. इथून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. मात्र, आता त्यांनीच इथून लढावं, असा आग्रह केला जात आहे. महायुतीविरोधात श्रीनिवास पाटील हेच चांगला लढा देऊ शकतील अशी वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे.  

दरम्यान, सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं आहे. त्यामुले आता लोकसभेसाठी उमेदवार कोण असावा? याबाबत शरद पवार गटाकडून खलबतं सुरू आहेत. एकीकडे श्रीनिवास पाटलांची मनधरणी सुरू असून दुसरीकडे जर श्रीनिवास पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले, तर मात्र लोकसभेला कोणाला रिंगणात उतरवायचं? याची चाचपणी शरद पवार गटाकडून सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget