एक्स्प्लोर

Narayan Rane : ठाकरेंशी सततचा पंगा, स्थानिक  नेत्यांशी नेहमीच दंगा, विरोधकांना अंगावर घेणाऱ्या, नारायण राणेंची ताकद किती?

Narayan Rane, Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha : गेल्या काही आठवड्यांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha) लोकसभेवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटलाय.

Narayan Rane, Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha : गेल्या काही आठवड्यांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग (RatnagiriSindhudurg Lok Sabha) लोकसभेवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटलाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उमेदवारी खेचून आणलीये. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) या जागेवरून लढण्यास इच्छुक होते. पण नारायण राणेंनी (Narayan Rane) शेवटपर्यंत दावा सोडला नाही. अखेर उदय सामंत (Uday Samant) यांनाच माघार घ्यावी लागली आहे. भारतीय जनता पक्षाने गुरुवारी म्हणजे 19 एप्रिल रोजी राणेंना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि स्थानिक नेत्यांशी सातत्याने पंगा घेणार्‍या नारायण राणे यांच्या समोर कोणती आव्हाने आहेत? नारायण राणेंची (Narayan Rane) मतदारसंघात किती ताकद आहे? जाणून घेऊयात....

नारायण राणेंचा विनायक राऊत यांच्याशी सामना 

ठाकरे गटाने विद्यमान खासदार आणि निष्ठावंत शिवसैनिक विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यासमोर विनायक राऊतांचे सर्वात मोठे आव्हान आहे. नारायण राणे यांचा यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये पराभव झालाय, आता त्यांच्या पराभवाची हॅटट्रिक करणार, 4 जूननंतर नारायण राणेंची झोप उडेल, असं  विनायक राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राणे यांच्यासमोर विनायक राऊत यांचं कडवं आव्हान असणार आहे. शिवाय 2019 मध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता. नारायण पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

नारायण राणेंची ताकद किती?

नारायण राणे यांची सिंधुदुर्गमध्ये मोठी ताकद आहे. सिंधुदुर्गमध्ये त्यांनी सुरुवातीपासून दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. शिवाय, राणे यांचे पुत्र नितेश राणे हे कणकवली विधानसभेचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघांतून त्यांना लीड मिळवता, येऊ शकतो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात नारायण राणे यांची बाजू कमकुवत आहे. त्यांना इथे ताकद वाढवता आलेली नाही. मला 4 मतदारसंघातून लीड मिळाला, की मी निवडून येईल, असं नारायण राणे त्यांनीच म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या विजयाचे गणित शिंदे गटाच्या आमदारांवरही निर्भर असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आहेत, तर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आहेत. हे दोन्ही आमदार शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे राणेंना या दोन्ही आमदारांची दिलजमाई करावी लागणार आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदारही या मतदारसंघात आहे. त्याचाही पाठिंबा मिळवणे राणेंसाठी आवश्यक आहे.

ठाकरेंची ताकद किती?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चांगलीच ताकद आहे. दोन शिवसेना  निर्माण झाल्यानंतरही ठाकरेंची ताकद कमी झालेली नाही. कारण उद्धव ठाकरेंचे  वैभव नाईक आणि राजन साळवी दोन आमदार या मतदारसंघात आहेत. त्यामुळे ठाकरेंना या मतदारसंघातील 2 आमदार सोडून गेलेत तर 2 अजूनही पाठीशी आहेत. शिवाय आमदार भास्कर जाधव यांचाही या मतदारसंघात प्रभाव असल्याची बोलले जाते. याचा फटकाही राणेंना बसू शकतो.

नारायण राणेंचा सलग दोनदा पराभव 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना यापूर्वी दोन वेळेस पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेना,  काँग्रेस, स्वतःचा पक्ष ते भाजप असा त्यांचा राजकिय प्रवास आहे. त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि आता केंद्रीय मुख्यमंत्रिपदही उपभोगलय. मात्र, नारायण राणेंचा दोन वेळेस पराभवही झाला आहे. नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी कोकणात पराभव केला होता. तर महिला शिवसैनिकाने पोटनिवडणुकीत नारायण राणेंना पाडलं होतं.

ठाकरेंना सहानुभूती ?

उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकणात मजबूत होती. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना अनेक मतदारसंघात सहानुभूती असल्याचे बोलले जात आहे. त्यात राजन साळवी यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंना सहानुभूती मिळाली तर नारायण राणेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोदींच्या लोकप्रियतेचा राणेंना फायदा ?

नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा वारंवार उल्लेख केलाय. मला मत म्हणजे मोदींना मत असं गणितचं नारायण राणे यांनी मांडलं आहे. त्यामुळे भाजपच्या विचारांचा मतदार नारायण राणेंना मतदान करू शकतो. शिवाय मोदींच्या लोकप्रियतेचा फायदाही नारायण राणेंना होऊ शकतो.

नारायण राणेंसाठी अमित शाहांची सभा 

नारायण राणेंसाठी अमित शाह अॅक्शन मोडवर आले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंसाठी  24 एप्रिलला अमित शहा यांची जाहीर होणार आहे. भाजपकडून सभेसाठी गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नारायण राणेंचा आत्मविश्वास वाढलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

हा तर तुळजाभवानीचा अपमान, उद्या 'जय शिवाजी' शब्द काढायला लावाल; ठाकरेंचा निवडणूक आयोगावर प्रहार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget