Thackeray Group VS Raj Thackeray : आयपीएलमधला इम्पॅक्ट प्लेअर साकारला, ठाकरेंच्या शिवसैनिकांची राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून टोलेबाजी
Kalyan, Thackeray Group VS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यानंतर ठाकरे गटाने सातत्याने त्यांच्यावर हल्लाबोल केलाय.
![Thackeray Group VS Raj Thackeray : आयपीएलमधला इम्पॅक्ट प्लेअर साकारला, ठाकरेंच्या शिवसैनिकांची राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून टोलेबाजी Thackeray Group VS Raj Thackeray Impact player in IPL made, Thackeray's Shiv Sainiks mock Raj Thackeray through cartoons Maharashtra Politics Marathi News Thackeray Group VS Raj Thackeray : आयपीएलमधला इम्पॅक्ट प्लेअर साकारला, ठाकरेंच्या शिवसैनिकांची राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून टोलेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/21/1cf51fa22795e5df1cadd448c522882f1713695395633924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kalyan, Thackeray Group VS Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय. त्यानंतर ठाकरे गटाने सातत्याने त्यांच्यावर हल्लाबोल केलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ हरदास यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे व्यंगचित्र काढलेला उपरोधिक बॅनर अहिल्याबाई चौकात लावलाय. या बॅनरवर राज ठाकरे यांचे कार्टून काढण्यात आले आहे. या कार्टुनमध्ये राज ठाकरेंच्या पायात पॅड दुसऱ्या हातात बॉल देण्यात आलाय. आयपीएलमध्ये जसा इम्पॅक्ट प्लेयर असतो, तसे या बॅनर खाली उपरोधिकपणे इम्पॅक्ट प्लेयर असे लिहले आहे. आता मनसेकडून या बॅनरला काय प्रत्युत्तर देण्यात येते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार?
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल शेवाळे यांनी काही दावे केले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) मनसे स्थापनेनंतर 18 वर्षांनी शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं होतं.
राज ठाकरेंनी भूमिका बदलली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2019 मध्ये पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाह राजकीय क्षितीजावर दिसता कामा नयेत, असं म्हणत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काम केलं होतं. मात्र, 5 वर्षानंतर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका 360 अंशात बदलली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहिर केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंना चौफेर टीकेला सामोरे जावे लागत आहे.
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला होता. राज ठाकरे म्हणजे दात पडलेला. नखे काढलेला वाघ आहे, असा वाघ कोणाला नाही नकोय, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. त्यांनी पक्ष स्थापन झाल्यापासून झेंडाही अनेकदा बदलला. आधी निळा, त्यानंतर हिरवा, आता भगवा केलाय. त्यामुळे हा दात पडलेला वाघ आहे, अशी बोचरी टीका पेडणेकर यांनी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)