एक्स्प्लोर

भाजपला सोडचिठ्ठी देत माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर करणार आज राष्ट्रवादीत प्रवेश, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

माधवराव किन्हाळकर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून आज शरद पवारांच्या उपस्थितीत ते पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

Nanded News: लोकसभा निवडणूकीनंतर भाजपला गळती लागली असून माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षांतील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खदखद बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासोबत २०१४ साली राष्ट्रवादीला सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

राजकीय विरोधकही आले भाजपमध्ये

काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर त्यांचे राजकीय विरोधक असणारे माधवराव किन्हाळकर नाराज असल्याचे सांगितले जात होते. दुसरीकडे भाजपमधून उमेदवारीची अपेक्षा असताना किन्हाळकरांना संधी न देत दहा वर्ष अडगळीत ठेवल्याच्या भावनेतून त्यांनी ९ जुलैला भाजपला सोडचिठ्ठी दिली.

राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला विराम

भाजपमधून बाहेर पडल्यापासून माधवराव किन्हाळकर राष्ट्रवादीत वापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होती. यावर आता पूर्णविराम लागला असून आज (20 जुलै) आज संध्याकाळी ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

भाजपमध्ये प्रवेश करून १० वर्षे काम केल्यानंतरही माधवराव किन्हाळकर यांना संधी न मिळाल्याने त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला होता. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपला मराठवाड्यात पुन्हा एकदा गळती लागल्याची चर्चा होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपात काहीही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. भाजपने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीलाही सोबत घेतले. त्यामुळे, भाजपमधील काही नेते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असते. आता, भाजपमधील नाराजी उघडपणे समोर येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात झालेल्या दोन नेत्यांच्या राजानाम्यामुळे भाजपला मराठवाड्यात धक्का बसल्याचे स्पष्ट झालं आहे. सूर्यकांता पाटील यांनी भाजप सोडल्यानंतर खासदार अशोक चव्हाणांवर टीका केली होती. त्यानंतर, आता माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माधव किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जवाबदारी होती. त्यामुळे, सूर्यकांता पाटील यांच्यानंतर हा भाजपसाठी दुसरा धक्का मानला जात आहे. 

शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते मंत्री

डॉ. माधव किन्हाळकर यांनी 2014 मध्ये भोकर (विधानसभा मतदारसंघ) मधून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी, 53,224 मते मिळवून  ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यांनी 1991 ते 1999 या कालावधीत भोकर मतदारसंघाच्या विधानसभेचे काँग्रेस सदस्य म्हणून काम केले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये 1991 ते 1995 या कालावधीत ते गृह व्यवहार, महसूल आणि सहकार राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते

हेही वाचा:

भाजपला मराठवाड्यात आणखी एक दे धक्का; माजी गृहराज्यमंत्र्यांकडून सोडचिठ्ठी, सर्वच पदांचा राजीनामा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Embed widget