लोकसभा पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकरांना मोठा धक्का! भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जवळचे आणि कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्याने चिखलीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
![लोकसभा पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकरांना मोठा धक्का! भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Nanded news BJP Suhas Patil shifts from BJP to congress shocking for Pratap Patil Chikhlikar Maharashtra Politics Vidhansabha election लोकसभा पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकरांना मोठा धक्का! भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/31/c21ce36bffeb6b219c32d6d503eba7fc17224129361001063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nanded: राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha election) जोरदार तयारी सुरू राजकीय घटनांना वेग आला आहे. कोणाचा पाठिंबा कोणाला राहणार? कुठला समर्थक कुणाच्या मागे उभा राहणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान नांदेडमध्ये माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांना मोठा धक्का बसल्याचे दिसतय. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चिखलीकरांचे कट्टर समर्थक आणि भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील (Suhas Patil) यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
विधानसभेत अशोक चव्हाण यांचा भोकर विधानसभा मतदार संघासाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.
लोकसभा परभवानंतर चिखलीकरांना दुसरा धक्का
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सात मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. यामध्ये हमखास निवडून येणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील यादीत अग्रणी नाव असलेला नांदेड मतदार संघही होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जागा महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा दावा केला जात होता. यामध्ये माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी अनेक आढावा बैठकांमधून त्यांनी कार्यकर्त्यांवर पराभवाचे खापर फोडल्याचे दिसले होते. दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जवळचे आणि कट्टर कार्यकर्ते समजले जाणारे भाजप जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्याने चिखलीकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
विधानसभेचा भोकर मतदार संघासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड मतदार संघात लोकसभेत महायुतीला मोठा पराभव पत्करावा लागला. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघासाठी सुहास पाटील यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेस कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला.
हेही वाचा:
81 कोटींचे प्रकल्प, नांदेड, ठाण्यालाही फायदा; मंत्रिमंडळ बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)