Nana Patole : पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला, पंतप्रधानांनी माफी मागून चूक कबुल केली : नाना पटोले
Nana Patole on Narendra Modi : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.30) माफी मागितली आहे. मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.
Nana Patole on Narendra Modi : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.30) माफी मागितली आहे. मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो, अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. पीएम मोदी (Narendra Modi) यांनी शिवभक्तांची सूद्धा माफी मागितली. माझे संस्कार वेगळे आहेत असे म्हणत माफी मागत असल्याचेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. ते पालघरमध्ये बोलत होते. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले काय काय म्हणाले?
नाना पटोले म्हणाले, पंतप्रधानांनी माफी मागून त्यांनी चूक केलेली आहे हे मान्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाई ने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला. माफी मागण्याची काय गरज पडली. त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा तिथं प्रतिमा मांडली गेली, ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही? मूर्ती बरोबर आहे की नाही? सांस्कृतिक संचालकांनी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही? हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं.
पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला
विभागांनी पुतळ्याबाबत सर्व काही बघायला पाहिजे होतं. पण, महाराजांचा अपमान हे पेशव्यांच्या काळात सुद्धा केला जात होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला. हा प्रश्न माफीने सुटणार नाही. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावली आहे. यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी टीकाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
नरेंद्र मोदी काय काय म्हणाले होते?
मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या