Prakash Ambedkar : सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक शंका
Prakash Ambedkar : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय मोठं आणि धक्कादायक विधान केलंय.
Prakash Ambedkar अकोला : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अतिशय मोठं आणि धक्कादायक विधान केलंय. पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाहीय. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय.
प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहेय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. तर या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जनतेची माफी का मागत नाही?, याचाही खुलासा करण्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, तिसऱ्या आघाडी संदर्भात 10 सप्टेंबरला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं ते म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते.
संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा- प्रकाश आंबेडकर
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भात अनेक वक्तव्य पुढे आले आहेत. परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फूले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मला असा संशय येतो आहे की हा पुतळा पडला की पाडला?
कारण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केल्या गेल्या नाही ना? अशा संशयाला जागा आहे. त्यामुळे या पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
स्ट्रक्टरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बांधकाम सल्लागार (स्ट्रक्चरल कन्सल्टंट) चेतन पाटील याला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर चेतन पाटील (Chetan Patil) याला पुढील चौकशीसाठी मालवणात नेण्यात आले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन तातडीने मालवणच्या दिशेने रवाना झाले होते. चेतन पाटीलला मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आले असून दुपारी साडेतीन वाजता मालवण दिवाणी न्यायालयात दाखल केले जाणार आहे. या सुनावणीत काय घडणार, हे पाहावे लागेल.
हे ही वाचा