Nana Patole on Maratha Reservation : सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे राहिले नाही, हे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिलं, मराठा ओबीसी वादावर माझ्याकडे मार्ग : नाना पटोले
Nana Patole on Maratha Reservation : "राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला, हे सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही. हे आज राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिले आहे. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीचा उद्देशच तो होता. मराठा ओबीसी संघर्ष संपवायचे सोल्युशन आमच्याकडे आहे, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो."
![Nana Patole on Maratha Reservation : सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे राहिले नाही, हे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिलं, मराठा ओबीसी वादावर माझ्याकडे मार्ग : नाना पटोले Nana Patole on Maratha Reservation The senior minister of the state has shown that the government is no longer fit to run the government Marathi News Nana Patole on Maratha Reservation : सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे राहिले नाही, हे राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिलं, मराठा ओबीसी वादावर माझ्याकडे मार्ग : नाना पटोले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/15/6badf6da59616e262d28ddb1a5ac7a431721068082196924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nana Patole on Maratha Reservation : "राज्य सरकारनेच महाराष्ट्र पेटवला, हे सरकार सत्ता चालवायच्या लायकीचे नाही. हे आज राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यानेच दाखवून दिले आहे. भुजबळ आणि पवार यांच्या भेटीचा उद्देशच तो होता. मराठा ओबीसी संघर्ष संपवायचे सोल्युशन आमच्याकडे आहे, तुम्हाला जमत नसेल तर ते आम्ही करतो. यासाठी पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करावी लागेल आणि यानंतर हे सर्व प्रश्न सुटू शकतील. मात्र मोदी तयार नसल्याने हा वाद संपणारच नाही. या वादात सरकारच पेट्रोल टाकत असल्याची परिस्थिती आपण पाहत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण देतो", असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते पंढरपुरमध्ये बोलत होते.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नाना पटोले आशावादी
नाना पटोले म्हणाले, वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही, ही माझे गुरु विलासराव देशमुख यांची शिकवण आहे. मी डोक्यात ठेवलीये. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचे ते होईल. नाना पटोले यांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आशावादी असल्याचे संकेत आज विठ्ठल मंदिरात दिले. नाना पटोले विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात चक्क भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा घातली. यावर खुश झालेल्या नानांनी थेट विना गळ्यात घेऊन देवाचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत
फेटा आणि वीनाबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले, हा फेटाही कार्यकर्त्यांनी घातला आणि वीणाही कार्यकर्त्यांनी घातल्याचे नाना पटोले म्हणाले. मला सध्या पेटत असलेला महाराष्ट्र शांत करायचा आहे. महाराष्ट्राला पूर्वीचे सोन्याचे दिवस आणायचे आहेत. माझी लढाई खुर्चीची नाही तर महाराष्ट्राच्या विकासाची आणि जनतेच्या हिताची लढाई आहे.
नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला ॥
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 15, 2024
टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी ॥
चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी |
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी ||
आषाढी वारीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख… pic.twitter.com/QkzF9aW39S
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी |
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 15, 2024
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
📍 भंडीशेगाव
आषाढी वारीच्या निमित्ताने भंडीशेगाव ता. पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होऊन दर्शन घेतले. मी परंपरेनुसार दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात पालख्यांचे आगमन… pic.twitter.com/bBU1OfK3nz
इतर महत्वाच्या बातम्या
Prakash Ambedkar on Vishalgad Violence : संभाजीराजेंच्या आंदोलनावेळी संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी धुडगूस घातला, सरकारने चौकशी करुन दंगलखोरांचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)