Nana Patole on Eknath Shinde : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे संपलेले असतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole on Eknath Shinde, Akola : मला 'भाजपचा एजंट' संबोधणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) कोणत्याही सर्टिफिकेटची मला गरज नाही.
Nana Patole on Eknath Shinde, Akola : "मला 'भाजपचा एजंट' संबोधणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) कोणत्याही सर्टिफिकेटची मला गरज नाही. कोण कोणाचे एजंट आहे, हे जनतेला चांगलेच माहिती आहे", असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते अकोला जिल्ह्यातील पिंजरमध्ये बोलत होते. यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही सडकून टीका केली आहे.
आंबेडकरांच्या कोणत्याच सर्टीफिकेटची मला गरज नाही
नाना पटोले म्हणाले, मला 'भाजपचा एजंट' संबोधणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या कोणत्याच सर्टीफिकेटची मला गरज नाही. कोण कुणाचे एजंट आहे हे जनतेला माहिती आहे. मविआमध्ये आपला अपमान झाला असं सांगणाऱ्या एकनाथ शिंदेंचा खरा अपमान भाजपने सुरु केला आहे. लोकसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे संपलेले असतील, अशी टीकाही नाना पटोलेंनी केलीये.
आपल्या लोकशाही वाचवणे आणि संविधान वाचवायचय
नाना पटोलेंनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'बनिया' असा एकेरी उल्लेख केलाय. देशात कोरोना मोदींनीच आणला. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. आपल्या लोकशाही वाचवणे आणि संविधान वाचवायचे आहे. इंडिया आघाडीच्या सरकारला केंद्रात बसवणे, महत्वाचे आहे. आमच्या पैसा अदाणी अंबानीकडे जात आहे तोच पैसा भाजपच्या घरात जात आहे. आता जनतेने ठरवायचे बरबाद वायचे की करायचे ? असंही पटोले यांनी स्पष्ट केले.
अकोल्यात अभय पाटलांना काँग्रेसची उमेदवारी
अकोल्यात काँग्रेस पक्षाने अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यापूर्वी वंचितशी आघाडीच्या चर्चा सुरु होत्या. तेव्हा महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चा सुरु होत्या. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत तिसरी आघाडी करताच काँग्रेस पक्षाने अभय पाटील यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली.
अकोल्यात तिरंगी लढत
अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. कारण भाजपने अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून अभय पाटील मैदानात उतरवण्यात आलं आहे. अभय पाटील हे मोठे सर्जन आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात अकोल्यातून तयारी सुरु केली होती. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवत आहेत. त्यामुळे अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिरंगी लढत असल्याने मतविभाजन होणार का? मतविभाजन झालेच तर याचा फायदो कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या