एक्स्प्लोर

Solapur Loksabha constituency : भाजप आमदारांची फिल्डिंग, प्रणिती शिंदेंचा प्रचाराचा धडाका, लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी? सोलापुरात तगडी फाईट

Solapur Loksabha constituency, Praniti Shinde VS Ram Satpute : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.

Solapur Loksabha constituency, Praniti Shinde VS Ram Satpute : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्या विरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना मैदानात उतरवलंय. भाजप आमदारांनी सातपुतेंच्या विजयासाठी शेवटच्या बुथपर्यंत जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर प्रणिती शिंदेंचा (Praniti Shinde) प्रचाराचा धडाकाही सुरूच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole),  माजी मंत्री सतेज पाटिल, काँग्रेस नेते यांच्या प्रचार सभा सोलापुरात पार पडल्या आहेत. त्यामुळे सोलापुरात भाजपचे आमदार आणि ताकद जास्त असली तरी प्रणिती शिंदे चांगली टक्कर देऊ शकतात, असं गणित सध्या सोलापुरात तयार झालंय. जाणून घेऊया दोन्ही उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे आणि विरोधात जाणारे मुद्दे कोणते?

सोलापुरात कोणाचे किती आमदार ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे स्वतः एकच महाविकास आघाडीच्या आमदार होत्या. त्याच लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरल्या आहेत. समाधान अवताडे, विजयकुमार देशमुख,  सुभाष देशमुख,  सचिन कल्याणशेट्टी हे भाजपचे 4 आमदार राम सातपुतेंसाठी ताकद लावताना दिसत आहेत. याचा फायदा राम सातपुतेंना होऊ शकतो. 

तीन मतदारसंघात लिंगायत मतदारांची मोठी संख्या 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या फार मोठी आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर,  अक्कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज बहुसंख्येने आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लिंगायत धर्मगुरु जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे लिंगायत समाजाचे एक गठ्ठा मतदान भाजपला मिळालं होतं. मात्र यावेळी भाजपने जयसिद्धेश्वर महाराजांचे तिकिट कापल्याने लिंगायत समाज नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय माजी गृहमंत्री सुशीलकुमार कुमार शिंदे यांचे लिंगायत समाजाशी ऋणानुबंध आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे लिंगायत मत मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात, असे बोलले जात आहे.

भगीरथ भालके, आडम मास्तर, मोहिते पाटलांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा 

धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा शरद पवारांसोबत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील समीकरण बदललं आहे.  भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटलांना मानणार वर्ग प्रणिती शिंदेंना साथ देऊ शकतो. पंढरपूरचे माजी आमदार स्व. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी भेट घेऊन प्रणिती शिंदे यांना पाठींबा दिलाय. तर आडम मास्तरही शिंदेंच्या मदतीला धावले आहेत. याचा फायदा प्रणिती शिंदेंना होऊ शकतो.

धर्मराज काडादींनी भाजप विरोधात शड्डू ठोकला 

लिंगायत समाजाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर सोलापुरात चांगलाच गदारोळ झालाय. चिमणीचा मुद्दा यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आलाय. या प्रश्नावर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकविण्याची हाक दिली आहे. भाजपला निवडणुकीत पाडा, असे आवाहन काडादी यांनी कारखान्याच्या 27 हजार सभासद शेतकऱ्यांना केलं आहे. धर्मराज कादडी यांच्या नेतृत्वाला लिंगायत समाजाची मान्यता आहे. त्यामुळे राम सातपुतेंना याचा मोठा फटका बसू शकतो.  

वंचितकडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिवाय, तेव्हा वंचित आणि एमआयएमची युती देखील होती. मात्र, यावेळी दोन्ही पक्षांची युती यावेळी राहिलेली नाही. शिवाय यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा तगडा उमेदवार भाजपने दिलेला नाही. याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो. 

इतर महत्वाच्या बातम्या 

सोलापूरच्या जागेवर लवकरच मोठा ट्विस्ट, महत्त्वाचा उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेणार!

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget