Namdev Shastri : भगवानबाबांना कोणाच्या राजकीय अस्तित्वाची गरज नाही, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याबाबत महंत नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया
Namdev Shastri on Pankaja Munde : भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Namdev Shastri on Pankaja Munde, अहमदनगर : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा दसरा मेळावा भगवान गडावर पार पडत आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भगवान गडावर (Bhagwan Gad) मोठी गर्दी केली आहे. भगवान गडावर समर्थकांच्या हाती गोपीनाथ मुंडेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. तर गडावरील भगवान बाबांच्या आकर्षक मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भगवान गडावरील आजच्या भाषणात ओबीसी आणि मराठा संघर्षावर भाष्य करणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबाबत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री (Namdev Shastri) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडाच्या दसऱ्या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. ही परंपरा मुंडे साहेबांनी सुरु केलेली नाही. गेल्या 10 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर भगवान गडावर होणारा दसरा मेळावा हा मी बंद केला. त्यांच्या वादामुळे भगवान गडावरचा मेळावा बंद झालेला नाही. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्याचा वयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला अशी प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी दिली आहे.
धनंजय मुंडे काय काय म्हणाले?
दसरा मेळाव्याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, संतश्रेष्ठ भगवानबाबाच्या भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणून दसऱ्याला मेळाव्यला सुरु झाला.
नंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि पंकजाताईंनी ती परंपरा सुरु ठेवली. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचाराचा सिमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केला जातो. मी स्वतः भगवान बाबांचा भक्त आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद आहे. भगवान गडाचे भूमीपूजन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हस्ते झाले. त्यावेळी नावं काय ठेवावं असं विचारलं तेव्हा स्वतः यशवंतराव चाव्हाण साहेबांनी सांगितलं तुमच्या नावातच भगवान आहे त्यामुळे भगवान गड नावं ठेवलं. मी या परंपरेपासून जवळपास एक तप दूर होतो, एका तपानंतर या ठिकाणी येताना एक अद्भुत आनंद मनात आहे. 12 वर्ष मी या सर्वापासून लांब होतो, त्यामुळे व्यासपीठावर काय बोलणार माहिती नाही. स्टेजवर गेल्यानंतरच जे मनात येईल ते बोलेन.
इतर महत्त्वाच्या बातम्या