एक्स्प्लोर

Vikas Kumbhare : फडणवीस आणि गडकरी मोठे नेते, ते त्यांच्या मनाप्रमाणे....; होल्डवर ठेवण्यात आलेल्या भाजप आमदारचे सूचक वक्तव्य

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजप श्रेष्ठी ज्या नावाला पसंती देतील, ते मला मान्य राहील. दुसरा उमेदवार दिल्यास त्याच्यासाठी मी काम करेल, अशी ग्वाही मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांनी दिलीय.

Maharashtra Assembly Elections 2024 : नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून (VidhanSabha Election 2024) भाजप श्रेष्ठी ज्या नावाला पसंती देतील, ते मला मान्य राहील. माझ्याशिवाय दुसरा उमेदवार दिल्यास त्याच्यासाठी काम करेल, अशी ग्वाही मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे (Vikas Kumbhare) यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने कालच्या यादीत ज्या आमदारांची नाव होल्डवर ठेवली आहे, त्यांच्याशी भाजप श्रेष्ठींनी संपर्क साधून त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आल्याचं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) मोठे नेते आहेत, ते त्यांच्या मनाप्रमाणे चालतात, त्यामुळे मध्य नागपूर संदर्भात ते जे निर्णय करतील तो मान्य राहील, असं सूचक वक्तव्यही विकास कुंभारे यांनी केले आहे.

विशेष म्हणजे मध्य नागपूर मध्ये हलबा समाजाचे सर्वाधिक मतदार आहे. त्यामुळे भाजपने (BJP) हलवा उमेदवार द्यावा , की दुसऱ्या समाजाचा उमेदवार द्यावा, हा निर्णय पक्ष श्रेष्ठींनी करावा असेही कुंभारे म्हणाले. 

8 विद्यमान आमदार अजूनही वेटिंगवर

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

दरम्यान, विदर्भातील 23 मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह 19 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर कामठी, देवळी, अचलपूर, आमगाव या उर्वरित 4 ठिकाणी माजी आमदार किंवा इतर इच्छुकांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या  यादीत 23 मतदारसंघात भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असले, तरी विदर्भात भाजपचे आमदार असलेल्या नागपूर मध्य, आर्णी, उमरखेड, गडचिरोलीअकोला पश्चिम, आकोट, मुर्तीजापुर, आर्वी, कारंजा आणि वाशिम या 10 मतदारसंघात भाजपने त्यांचे विद्यमान आमदार असतानाही अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही. ज्या 10 मतदार संघात भाजपचे आमदार असतानाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यापैकी 8 ठिकाणी विद्यमान आमदारांना भाजपने वेटिंग वर ठेवले आहे. तर 2 ठिकाणी भाजपचे आमदार दिवंगत झाले आहे, तिथेही भाजपने आज उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे तिथे भाजपला नवीन उमेदवार शोधावेच लागणार आहे. 

विद्यमान आमदार की नव्या चेहऱ्यांना संधी?

आजच्या यादीत फक्त एका विद्यमान आमदाराची टिकीट भाजपने कापली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ज्या कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, त्या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना पुन्हा संधी न देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे विदर्भात भाजपचे आमदार असलेल्या 10 मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, की नवे चेहरे आणले जातील किंवा ते मतदारसंघ मित्र पक्षांकडे जातील हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमकMumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
Embed widget