खासदार धैर्यशील मोहिते पाटील मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंचे मानले आभार
माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha) नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.
Dhairyasheel Mohite Patil : माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha) नवनिर्वाचीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मातोश्री (Matoshree) निवासस्थानी जात धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मोहिते पाटील यांना चांगली साथ दिली. त्यानिमित्त मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले.
दरम्यान, माढा लोकसभेचे खासदार श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, उपजिल्हाप्रमुख नामदेव (नाना) वाघमारे, तालुकाप्रमुख संतोष राऊत, बंडू घोडके, सूर्यकांत घाडगे, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचं वर्चस्व असलेल्या मतदारसंघात मोहिते पाटलांनी मिळवला विजय
माढा लोकसभा मतदारसंघात (Madha loksabha Election) मतदारांनी भाकरी फिरवली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairsheel mohite patil) हे विजयी झाले आहे. त्यांनी मोठ्या फरकाने भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांचा पराभव केला आहे. हा भाजपसाठी मोठा हादरा आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात सहा तालुके येतात. या सहाही तालुक्यात महायुतीचं वर्चस्व आहे. तरीदेखील मोहिते पाटील निवडूण आले आहेत.
माढा लोकसभेत मोहिते पाटलांना मिळालं 1 लाख 20 हजाराहून अधिक मताधिक्य
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. 1 लाख 20 हजाराहून अधिक मताधिक्य मोहिते पाटील यांनी घेतलं आहे. हा भाजपसाठी मोठी धक्का आहे. कारण या मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मतदारसंघात सभांचा आणि बैठकांचा धडाका लावला होता. मात्र, सर्व नेते एकिकीडे आणि जनता एका बाजूला झाल्याचं चित्र माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळालं. या निवडणुकीत अखेर मोहित पाटील यांनीच बाजी मारली.
महत्वाच्या बातम्या:
शिंदे बुंधुंच्या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांची मुसंडी, निंबाळकरांना दणका, कोणत्या तालुक्यात किती मताधिक्य?