(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Modi Govt 8 Year: मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लान
8th Year Modi Government Prepration for Celebration: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत.
8th Year Modi Government Prepration for Celebration: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी संमेलन, युवा संमेलन आणि मागासवर्गीयांसाठीचे संमेलन आयोजित केले जाणार आहे. त्याचबरोबर देशातील मंदिरांमध्ये त्यांच्या स्तरावर पूजेचे कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय या उत्सवात यज्ञही करण्यात येणार असून हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येणार आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. ही टीम मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे कार्यक्रम केले जाणार आहेत त्याचे नियोजन करणार आहे. देशभरात उत्सवासोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने सप्ताह बुथ कमिटी टीम तयार केली आहे. या समितीमध्ये 4 ते 5 सदस्य असतील, जे देशभरात भाजप कमकुवत असलेल्या बूथमध्ये भाजप पक्ष बळकटीसाठी काम करतील.
देशात कमकुवत असलेल्या बूथ मजबूत करणार
आगामी निवडणुकीसाठी कमकुवत बूथ मजबूत करणे हे भाजपचे सर्वात मोठे लक्ष आहे. विजयंत पांडा हे भाजपच्या कमकुवत बूथ टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीममध्ये भाजपचे सरचिटणीस सीटी रवी, लाल सिंग आर्य आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या देखरेखीखाली 12 नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम कशा प्रकारे काम करणार आहे, याचा आराखडा तयार करण्यात येत असून याबाबत निर्णय 5 मेपर्यंत केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविला जाणार आहे. यानंतर मोदी सरकारच्या 8 वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा हे ठरवले जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- PM Kisan Yojana : मोठी बातमी! पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी येणार पैसे?
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचं 'पाकिस्तान कनेक्शन', शाहबाज पंतप्रधान झाल्यानंतर हल्ले वाढले!
- Russia Ukraine War : रशियाच्या क्रूरतेचं धक्कादायक वास्तव, युक्रेनच्या मारियुपोलमध्ये सापडली सामूहिक कबर, 1000 मृतदेह असण्याचा अंदाज