एक्स्प्लोर

मोठी बातमी : राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीचा तपशील समोर, भाई म्हणाले, Thank You, राज ठाकरेही म्हणतात, सहकार्य राहील!

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या. तर, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला हवं तसं यश मिळालं नाही.

मुंबई : शिवसेना पक्षातील फुटींतर मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले होते. त्यानंतर, अनेकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाण्यात सभा देखील घेतली होती. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले. तरीही राज यांनी एकनाथ शिंदेंवर प्रखर टीका करणे टाळले होते. आता, महापालिका (KDMC) निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच दोन नेते एकत्र आल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंनी आज ठाण्यातील नंदनवण बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेऊन 20 ते 25 मिनिटे चर्चा केली.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या. तर, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला हवं तसं यश मिळालं नाही. मात्र, भाजप-शिवसेनेविरुद्ध लढणाऱ्या मनसेनं महापौर निवडीवेळी शिंदेंच्या शिवसेनेसा पाठिंबा दिला. त्यामुळे, सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेल्या मनसेनं थेट शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने पुन्हा ह्या पाठिंब्याची चर्चा झाली. 

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहिल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह इतरही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.  

राज भेटीवर ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली. त्यावर येवढं मोठं काही करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आमचे विरोधी नेते जरी असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी कोणाला भेटायला जावं, जाऊ नये, यावर आम्ही काही बोलू शकत नाही. राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यामध्ये आक्षेपार्ह असं काहीच नाही. एका पक्षाचे प्रमुख राज्याच्या उपमुख्यमंत्र्याना भेटतात, यामध्ये नक्कीच काहीतरी कारणं असू शकतात, असंही सुषमा अंधारेंनी सांगितले.

हेही वाचा

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget