एक्स्प्लोर

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर 'हा' नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर थेट भाष्य केलं. मला विलिनीकरणावर बोलायचं नाही, असे म्हणत त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होते असे म्हटले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विमान अपघात का घातपात असल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी आणि कॅप्टन सुमित कपूर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात मोठा गौप्यस्फोटही केला. अजित दादा नसल्याने दोन राष्ट्रवादीच्या (NCP) विलिनीकरणावर बोलणं योग्य नाही, पण संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर नवा प्रदेशाध्यक्ष ठरविण्यात येणार होता. त्यासाठी, अजित दादांच्या मनात युवा नेत्याचं नाव होतं ते खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) असेही रोहित पवार यांनी सांगितले.  

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर थेट भाष्य केलं. मला आज विलिनीकरणावर अधिकचं बोलायचं नाही, असे म्हणत त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होते असे म्हटले. अजित दादा आज नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. मात्र, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित दादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनके बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते. त्यादृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत, ज्यांच्यासोबत आम्हाला कंफर्ट होता. त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती. दोन्ही पक्ष कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होते, असा गौप्यस्फोटच रोहित पवारांनी केला. 

डॉ. अमोल कोल्हे हे संयुक्तित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले असते, अशी दादांचीच इच्छा होती. त्यामुळेच, ते प्रामुख्याने बैठकीत पुढाकार घेत होते. ज्यांच्या घरी यासंदर्भात 13 बैठका झाल्या, त्या जयंत पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीत तुम्हाला दादा दिसून येतील, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

नाव घेता सुनिल तटकरेंवर टीका

विलिनीकरणाचा मुद्दा घेतला की चर्चा दुसरीकडे जाते. दुसऱ्या पक्षातील काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं. त्यांच्या बऱ्याच पत्रकार परिषदेत ते फक्त विलिनीकरणावरच बोलतात. मात्र, आम्हीच फक्त अजित दादांचा घात की अपघात यावर बोलत आहोत, असे म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी 35 आमदारांनी सह्या केल्या आहेत. इतर आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी सह्या का केल्या नाहीत, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. 

व्हीएसआर कंपनीची भूमिका संशयास्पद

अजितदादा यांच्या दुर्दैवी विमान अपघाताबाबत काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते, त्यानंतर तपासाला काहीशी गती आली असली तरी अद्यापही अपेक्षित वेगाने तपास होत नाही. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत अपघाताबाबत VSR कंपनीची संशयास्पद भूमिका, कंपनीच्या मालकाचे राजकीय लागेबांधे, विमान कंडीशन, पायलटची मनःस्थिती, ब्लॅक बॉक्समधील डेटाबाबत निर्माण झालेल्या शंका, तपासाला वेगळं वळण देण्यासाठी होणारा मानवी हस्तक्षेप आदी अनेक मुद्दे निदर्शनास आले आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, याबाबत दुसऱ्यांदा सविस्तर प्रेझेंटेशनसह पत्रकार परिषद घेऊन हा तपास निष्पक्ष होण्यासाठी देशाबाहेरील दोन एजन्सीची मदत घेण्याची आणि देशाचे व या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी राज्याचे आणि देशाचे विरोधी पक्षनेते, कुटुंबातील आणि पक्षातील प्रतिनिधी आणि काही तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी रोहित पवार यांनी केली. 

हेही वाचा

रोहित पवारांचे प्रश्न, शरद पवारांची राज्यसभा; सुप्रिया सुळेंनी मांडली भूमिका, भिगवणच्या घटनेवरही भाष्य

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Embed widget