एक्स्प्लोर

Prakash Mahajan on Raj Thackeray: दिन तुम्हारा, बताओ कहाँ... हवं असल्यास झारखंडलाही येतो; मनसे नेत्याचं निशिकांत दुबेंना थेट आव्हान

Prakash Mahajan on Raj Thackeray: राज ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर निशिकांत दुबे यांनी मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? अशी पोस्ट केली आहे. यावरून मनसे नेत्याने निशिकांत दुबेंना थेट आव्हान दिलंय.

Prakash Mahajan on Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. यानंतर भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं होतं. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला पटकून पटकून मारु, असं निशिकांत दुबे म्हणाले होते. निशिकांत दुबेंच्या या विधानावरुन राज ठाकरेंनी देखील प्रतिआव्हान दिलं आहे. दुबे..तुम मुंबई में आ जावो...मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे..., असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं. यानंतर निशिकांत दुबेंनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?, असं त्यांनी म्हटले आहे. आता यावरून मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.  

प्रकाश महाजनांचं निशिकांत दुबेंना थेट आव्हान 

प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरे आमचे सेनापती आहेत. मी त्याच्या एक पाऊल पुढे गेलो आहे. दिन तुम्हारा,  बताओ कहाँ... हवं असल्यास झारखंडलाही येतो, असे आव्हान त्यांनी निशिकांत दुबेंना दिले आहे. ते पुढे म्हणाले की, मराठी कुठे गेले नाही. अफगाण आम्हाला भीत होतं आणि हा शहाणा सांगतोय की, राज ठाकरेंना मी हिंदी शिकवतो. अरे राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफीकडून मराठी गाणे गाऊन घेतले आहेत. आमच्याकडे कावळा देखील मराठीत बोलतो. माझं नशीब आहे की, प्रत्येक भाजपा खासदाराला मला आव्हान द्यावे लागते. मुख्यमंत्री काहीही बोलत नाही, त्यांना समज देत नाहीत, असे म्हणत त्यांनी भाजप खासदार निशिकांत दुबेंवर हल्लाबोल केलाय. 

प्रकाश महाजनांची मनोज तिवारींवर टीका

राज ठाकरे यांच्यासारख्या प्रवृत्तीला शिक्षा मिळावी, असे वक्तव्य मनोज तिवारी यांनी केले होते. याबाबत विचारले असता कोण मनोज तिवारी? तो नाच्या. तू लाव तुझा सिनेमा मुंबईत मग दाखवतो. भाजपने असले लोक आमच्यावर सोडू नये. त्यांना हिंदूंमध्ये फूट पाडायची आहे, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे. 

राज ठाकरेंचं निशिकांत दुबेंना आव्हान

दुबे नावाचा कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारु. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेल वाल्यांनी त्याचं चालवलं का? त्याचं वक्तव्य दाखवलं का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आम्हाला पटक पटकके मारणार? दुबेला मी सांगतो...दुबे..तुम मुंबई में आ जावो...मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे..., असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. 

आणखी वाचा 

Nita Ambani Marathi Video: नीता अंबानींचं मराठी ऐकलं का? मुंबईत फ्लॅट घेत महाराष्ट्रावर गरळ ओकत सुटलेल्या भाजप खासदार दुबेंना चपराक देणारा व्हिडिओ

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget