![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर राम मंदीर झालंच नसतं, 'बिनशर्त' पाठिंब्यावर बोलताना राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्यामागचं नेमकं कारण आज पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिरावरही भाष्य केलं.
![...तर राम मंदीर झालंच नसतं, 'बिनशर्त' पाठिंब्यावर बोलताना राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक! mns chief raj thackeray said ayodhya ram temple would not form if narendra modi was prime minister ...तर राम मंदीर झालंच नसतं, 'बिनशर्त' पाठिंब्यावर बोलताना राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/425f832325e0b9d48cc8436da15966861712994156409988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : सध्याच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) म्हणजेच मनसेने भाजपला (BJP) बिनशर्त बाठिंबा दिला आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेत या निर्णयाची जाहीरपणे घोषणा केली होती. राज यांच्या या निर्णयानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर महायुतीने (Mahayuti) राज यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, राज यांच्या या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर त्यांनी आज (13 एप्रिल) पत्रकार परिषदेत भाजपला पाठिंबा देण्यामागचं नेमकं कारण सागंतिलं आहे. यावेळी बोलताना मोदी नसते तर अयोध्येतील राम मंदीर (Ayodhya Ram Temple) झालंच नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
मी याआधी भाजपवर टीका केली. त्यांनी घेतलेल्या काही भूमिकांवर मी टीका केली. मात्र त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत काही गोष्टी चांगल्या झाल्या. त्या चांगल्या कामांचं मी स्वागत केलं. त्यांनी कलम 370 रद्द केलं. भाजपच्या काळातच राम मंदीर झालं. आपल्याला धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करायचं नाही. परंतु 1992 पासून ते 2024 सालापर्यंत राम मंदिराचं काम रखडलं होतं. या मंदिरासाठी अनेक कारसेवकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे. शरयू नदीमध्ये कारसेवकांची टाकून दिलेली प्रेतं, कारसेवकांना घालण्यात आलेल्या गोळ्या हे सगळं तेव्हा माध्यमांवर दाखवलं जायचं. राम मंदिर उभं राहिल्यानंतर या सर्व कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील, असे राज ठाकरे म्हणाले.
मोदी नसते तर राम मंदिराचा विषय...
पुढे बोलताना मोदी नसते तर अयोध्येत राम मंदीर झालं नसतं, असंही राज ठाकरे म्हणाले. राम मंदिराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं. सध्या अनेक विषय प्रलंबित आहेत. मोदी नसते तर राम मंदिराचा विषयही असाच प्रलंबित राहिला असता. भाजपच्या सरकारने एनआरसी, कलम 370 याबाबत काही निर्णय घेतले. अशा अनेक गोष्टींचे मी स्वागत गेले. मी स्वत: फोन करून त्यांचे अभिनंदन केलेलं आहे. मोदी यांना पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं, अशा भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
दरम्यान, महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत. या मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवूच. यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, गड किल्ल्यांचं सवर्धन असे काही विषय आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला असून त्यांनी आमच्या कोणत्या नेत्यांशी संपर्क साधावा, याची यादी आम्ही त्यांना पाठवणार आहोत, असंही राज यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
आशियातील 'या' पाच कुटंबांकडे आहे गडगंज पैसा, सर्वांधिक श्रीमंतांमध्ये अंबानी परिवाराचा नंबर कितवा?
Raj Thackeray : भूमिका बदलणं गरजेचं होतं, मोदींना पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)