Video: वो आये मेरी मजार पर... आधी आमदाराची फडणवीसांसाठी शायरी, मुख्यमंत्र्यांचाही शायराना अंदाज
एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक राहिलेल्या आमदार सुमित वानखेडे यांच्या आजच्या भाषणातील शेरो शायरीने सर्वांचे लक्ष वेधले.

वर्धा : जिल्ह्यातील आर्वी येथे विविध कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर, खासदार अमर काळे यांच्यासह सर्व भाजप आमदार उपस्थित होते. या दरम्यान, भाषण करताना आर्वीचे आमदार (MLA) सुमित वानखेडे यांनी विविध मागण्या केल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळत शेरोशायरी देखील केल्याचं पाहायला मिळालं. शायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या आर्वीतील आगमनाच्या अनुषंगने स्तुतीसुमने उधळली. तर, देवेंद्र फडणवीसांनीही आपल्यावरील कौतुकाची फेड त्याच पद्धतीने शायरीतून केली. यावेळी, दोन्ही नेत्यांमधील हा शायराना अंदाज जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे आमदार सुमित वानखेडे हे कधीकाळी देवेंद्र फडणवीस यांचे पी.ए. होते.
एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक राहिलेल्या आमदार सुमित वानखेडे यांच्या आजच्या भाषणातील शेरो शायरीने सर्वांचे लक्ष वेधले. आपल्या शायरीमधून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात आर्वीत चंद्र उतरल्याचे म्हटले..
तुम आ गये हो तो चांदणीशी बात है !
जमीन पर चांद कब रोज रोज उतरता है !!
असा शेर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार वानखेडे यांनी स्तुतीत केली. पण, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण कराला उठले तेव्हा आमदार सुमित वानखेडे यांच्या शायरीची आठवण करत त्यांनीही शायरीतूनच प्रतिउत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचा हा शायराना अंदाज पाहून, ऐकून उपस्थित सारेच अवाक झाले.
फडणवीस म्हणाले, आमदार, खासदार आणि मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत, त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तर बाकी आमदार म्हणतील तुम्ही सगळं इथेच देता का, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शायरीतून आपली भूमिका मांडली. सुमित वानखेडेंनी माझ्यासाठी इतक्या शायरी केल्या, पण त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर माझ्या भाषणानंतर ते म्हणतील...
वो आये मेरी मजार पर, मिट्टी झाड कर बैठ गये !
और दीए मे जो तेल था वह सर पर लगाकर चले गये !!
असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच उपस्थितांनी हसून आणि टाळ्या वाजवून दाद दिली. मुख्यमंत्र्याचा शयारीची हा अंदाज सर्वांनाच अनोखा वाटला आहे. दरम्यान, येथील भाषणातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपसा सिंचन योजना, वीज निर्मित्ती, सौरऊर्जा आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भातही माहिती दिली.
हेही वाचा
शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बील कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा




















