एक्स्प्लोर

मोठी बातमी : विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामा देणार!

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला (Congress) आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार (MLA) आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा (Resigne) द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.  

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदार बनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते. 

सोलापूर दक्षिण आणि दर्यापूरचे आमदार

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाल्या आहेत. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे दोन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जात आहेत.  

हे 5 आमदारही राजीनामा देणार

विदर्भातील वर्धा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर, मराठवाड्यातील संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार झाले आहेत. तर, आमदार कल्याण काळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव केला. कल्याण काळे यांना 607897 मतं मिळाली. काळे यांनी दानवे यांचा 109958 मतांनी पराभव केला. मुंबईत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली. रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. काँग्रेस नेत्या आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget